high court  sakal media
मुंबई

पार्किंग जागा उपलब्ध असेल तरच नवीन वाहन खरेदीची परवानगी द्यायला हवी- HC

सुनिता महामुनकर

मुंबई : मुंबई आणि अन्य परिसरात निर्माण होणाऱ्या पार्किंगच्या (Mumbai parking problem) समस्येची गंभीर दखल आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) घेतली. पार्किंगची जागा उपलब्ध (parking availability ) असेल तरच नवीन वाहन (new vehicle ) खरेदी करायला परवानगी (permission) द्यायला हवी, केवळ 4-5 गाड्या घेणे परवडते म्हणून एखाद्या कुंटुबाला परवानगी का देता, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला (Maharashtra government) केला.

नवी मुंबईमधील वाहतूक आणि पार्किंग च्या वाढत्या समस्येबाबत स्थानिक रहिवासी संदिप ठाकूर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. पार्किगला जागा मिळत नसल्यामुळे वाहनचालक फूटपाथवर आणि रस्त्यावर सर्रासपणे गाड्या उभ्या करतात. यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून अपघाताचा धोका वाढतो, नवी मुंबई महापालिका यामध्ये कारवाई करत नाही, असा आरोप याचिकेत केला आहे. नवी मुंबईत पार्किंगचे नियोजन करा, असे निर्देश न्यायालयाने यापूर्वी दिले आहेत. तसेच नवीन बांधकाम प्रकल्पात पार्किंग उपलब्ध करण्यासाठीदेखील यापूर्वी न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

मात्र महापालिकेकडून याचे नियोजन होत नाही, असे सुनावणी दरम्यान सांगण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत मुंबईमधील दोन इमारतींच्या मधल्या जागेतही कार पार्किंगमुळे लोकांना व्यवस्थित चालायला जमत नाही. सोसायटीच्या आवारातील पार्किंगच्या जागाही अपुऱ्या पडत आहेत. यामुळे आता भूमिगत पार्किंगच्या पर्यायाचा विचार करायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. अद्याप राज्य सरकारने वाहन खरेदीवर बंधने आणली नाहीत, असे राज्य सरकारकडून सरकारी वकिलांनी सांगितले. याबाबत लेखी खुलासा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Playing XI: रजत पाटीदार कर्णधार, सरफराज-ऋतुराज गायकवाड संघात; सोशल मीडियावरील Playing XI मुळे खळबळ

पुण्यात खळबळ! विद्यापीठात बनावट डिग्रीचं रॅकेट? रिक्षाचालकाने उघड केलं गंभीर प्रकरण

"Gen Z तरुणी कुरूप आणि भ्रष्ट' कंगना रनौतचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाली... 'अनेकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याला स्वातंत्र्य मानतात'

Latest Live Updates Marathi : पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता 3.5 रिश्टर स्केल

MPSC Exam: 'एमपीएससी'चं चाललंय काय? अपात्र उमेदवारांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय; माहिती व जनसंपर्क विभागाची भरती प्रक्रिया कासवगतीने

SCROLL FOR NEXT