CM shinde  sakal
मुंबई

Mumbai : पक्ष, चिन्ह गेले, आता शाखांचे काय होणार ?

शाखांच्या मालकीवर शिंदे गटाने स्पष्ट केली भूमिका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे पक्ष आणि चिन्हाचा वापर आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे गटाला करता येणार आहे हे स्पष्ट झाले आहे. मुंबईत सध्या २२७ शाखांचे संघटनात्मक नेटवर्क आहे.

पक्षातील या यंत्रणेच्या मालकी हक्काबाबत शिंदे गट दावा करणार का ? याबाबतचेही तर्क - वितर्क लढवले जात होते. परंतु शिंदे गटाकडून याबाबतची प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे मुंबईतील शाखांचे काय होणार हे स्पष्ट झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील एकुण २२७ प्रभागांमध्ये शिवसेनेच्या शाखा आहेत. यापैकी अनेक शाखा या तत्कालीन नगरसेवक, शाखा प्रमुख तसेच शिवसैनिकांनी जागा घेऊन बांधलेल्या आहेत.

त्यामुळे संघटनात्मक पातळीवर या शाखांची मालकी ही शिवसेनेकडे नाही. यापैकी काही जागा ट्रस्टच्या मालकीच्याही आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय या मालमत्तांवर लागू होणार नाही.

शाखांच्या मालकीवरून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात उद्धव ठाकरेंकडून संभ्रम निर्माण काम करण्यात येत आहे. तसेच सहानभूती मिळवण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. आम्ही विचारांचे वारसदार आहोत, प्रॉपर्टीचे नाही.

त्यामुळे तुमची प्रॉपर्टी तुम्हालाच लखलाभ अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी दिली आहे. आम्ही सुरूवातीपासूनच कधीच प्रॉपर्टीवर दावा केलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही प्रत्येक विधानसभा निहाय शाखा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे.

आगामी काळात प्रभागांच्या अनुषंगाने आम्ही शाखांची सुरूवात करणार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हे उदिष्ट ठेवण्यात आलेले नाही. उलट आम्ही पक्षीय संघटनात्मक बांधणीसाठी हा प्रयत्न करत आहोत, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

सेनेतील शाखा सिस्टिम

शिवसेनेच्या १९६६ सालच्या स्थापनेनंतर झालेल्या १९८६ च्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सेनेचे तब्बल ४२ नगरसेवक निवडून आले. या यशानंतरच मुंबईत शाखेची सिस्टिम विकसित झाली. शिवसेनेची पहिली शाखा ही प्रमोद नवलकरांची गिरगावची शाखा म्हणून सांगितली जात.

पण त्याच वेळी माझगाव, करेलवाडी, घाटकोपर, भांडूप, जोगेश्वरी अशा ठिकाणी शाखांना त्या काळात नाक्यावरून सुरूवात झाली होती. म्हणजे या शाखांसोबत थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा थेट संपर्क होता.

महत्वाचे म्हणजे या शाखांच्या बैठका खुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात व्हायच्या. चाळीतील भांडण, नळाचे पाणी, तुंबलेली गटारे, दवाखान्याचा प्रश्न, घरातील बाप लेकाची भांडणे या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक सिस्टिम म्हणून शाखांची सुरूवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT