Cold
Cold sakal
मुंबई

रेकॉर्डब्रेक थंडीमुळे मुंबईकर हैराण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रेकॉर्डब्रेक किमान तापमान (Temperature) घसरल्याने श्वासोच्छवासाच्या तक्रारीत 45 टक्के तर विषाणू संसर्गाच्या तक्रारीत 35 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सार्वजनिक रुग्णालयातील आकडेवारी सांगत आहे. दिवसा तसेच रात्रीच्या किमान आणि कमाल अशा दोन्ही तापमानात वाढ झाल्याने सर्दी-खोकला, डोकेदुखी, संसर्ग आणि श्वसनाच्या तक्रारी (Respiratory Complaints) घेऊन सायन, केईएम, नायर सारख्या पालिका रुग्णालयांच्या (Municipal Hospital) बाह्यरुग्ण कक्षात (ओपीडीत) (OPD) रांगा लागल्या असल्याचे रुग्णालय प्रमुखांकडून सांगण्यात  येत आहे.  

दरम्यान, गेल्या आठवड्यात विषाणू संसर्गाचे तसेच श्वासोच्छवासाच्या समस्यांचे सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण नोंदवले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर विषाणू संसर्ग जसे डोकेदुखी, श्वासोच्छवास आणि घसादुखीच्या तक्रारी दररोज 30 ते 35 रुग्ण टक्के करत असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने पालिकेच्या केईएम, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, अंधेरी येथील कुपर तर नायर अशा चार प्रमुख पालिका रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात विषाणू संसर्गाचे सुमारे 30 ते 35 टक्के रुग्णवाढ झाले असल्याचे सांगण्यात आले.

यावर बोलताना येथील डॉक्टरांनी सांगितले की तापमान आणि हवामानातील चढउतारांमुळे वायरल ताप आणि फ्लू सारखी लक्षणे वाढत आहेत. अशी लक्षणे कोविडची देखील आहेत. मात्र बहुतांश रुग्ण कोविड निगेटिव्ह आहेत. अंगदुखी, ताप, घशाचा संसर्ग आणि सर्दी सारखी लक्षण असून देखील कित्येक रुग्णांची कोविड चाचणी नकारात्मक असते. सध्या खोकला, सर्दी आणि तापाचे रुग्ण जवळपास प्रत्येक घरात आढळत आहेत. तर यावर बोलताना पालिका प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, थंडी वाढल्या पासून हवामानातील बदलामुळे पालिकांच्या बाह्यरुग्ण विभागात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यापैकी बहुतेक मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील अनेकांना विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, घसादुखीची तक्रार आहे. मात्र, त्यांना आरटीपीसीआर करण्याचे सुचवत असल्याचे डॉ. भारमल यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT