Skin 
मुंबई

मुंबईकरांना आता घेरले या रोगाने

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पावसाळा म्हटले की विविध आजार आलेच. अनेक संसर्गजन्य आजारांचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. एरवी मलेरिया, डेंगी, स्वाईन फ्लू आदींसारख्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सध्या त्वचारोगाची समस्या भेडसावत आहे. ओले कपडे शरीरावर बराच काळ राहिल्याने नायटा आणि एक्‍झिमासारखे त्वचारोग शहरवासीयांमध्ये वाढताना दिसत आहेत.

यंदाच्या ऋतुमानात सध्या २५ टक्के रुग्ण वाढल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञांकडून दिली जात आहे. नायटाच्या त्रासाने साठ टक्के रुग्ण रोज दवाखान्याला भेट देत असल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. उदय खोपकर यांनी दिली. नायटामुळे दर दिवसाला नवे पाच रुग्ण दवाखान्याला भेट देत असल्याची माहिती त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नितीन नाडकर्णी यांनी दिली. पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर अंगाला खाज सुटणे, ओल्या भितींच्या स्पर्शामुळे झालेला नायटा, डासांच्या तीव्र चाव्याने उमटलेले लालसर चट्टे आदींचा त्यात समावेश आहे. पावसात घाणीच्या पाण्यात सातत्याने राहिल्याने त्वचारोग होण्याची शक्‍यता जास्त असल्याची माहिती डॉ. उदय खोपकर यांनी दिली. केवळ नायटाच्या त्रासानेही रुग्णांची तक्रार वाढत असल्याची माहिती आहे.

शरीर जास्त काळ पावसाच्या पाण्यात ओले राहिल्यास त्वचारोग होण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळे घरी पोहोचल्यावर निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याने आंघोळ करा. कार्यालयात गेल्यावरही स्वच्छ पाण्याने हातपाय धुऊन घ्या, असे आवाहन डॉ. खोपकर यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ATM बाहेर पुन्हा रांगा लागणार? रोख पैशांची अडचण वाढणार; मोठ्या संपाची घोषणा, पण कुठे आणि का?

IND vs ENG, 1st ODI: विराट कोहलीचे पुनरागमन, तर बुमराह तब्बल ९६८ दिवसांनी वनडेत परतला; कशी आहे भारत-इंग्लंडची Playing XI

Live News Update Marathi: राम रक्षा आंदोलन आयोजित करणाऱ्यांना 'राम रक्षा' याचा अर्थच माहित नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Monsoon Update : चार दिवस धो-धो कोसळून आता पाऊस कुठे गायब झाला? वाढत्या उन्हावर वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

Nashik Fruit Market : भाजीपाला स्वस्त, पण फळांचे भाव गगनाला! अमेरिकेचे सफरचंद 300 तर, न्यूझीलंडची किवी 600 रुपये किलो; ऑस्ट्रेलियाची संत्री, थायलंडच्या 'ड्रॅगन'ला काय भाव?

SCROLL FOR NEXT