mumbai pfi warns mns over raj thackeray loudspeaker ultimatum in mumbra
mumbai pfi warns mns over raj thackeray loudspeaker ultimatum in mumbra  
मुंबई

'छेडोगे तो छोडेंगे नही'; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा

सकाळ डिजिटल टीम

सध्या हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन मुद्द्यांवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मुंबईतील मशिदींतील भोंगे हटवण्याच्या अल्टिमेटमला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेने प्रत्युत्तर दिले आहे.

ठाण्यातील मुंब्रा येथे शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर पीएफआयचे मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या जातीय हिंसाचाराचा निषेध केला. मतीन म्हणाले, 'देशात मुस्लिमांवर अत्याचार होत असून काही लोकांना मुंब्य्रातील वातावरणही बिघडवायचे आहे. आमचा नारा आहे- छेडोगे तो छोडेंगे नही. महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरवरील अजानबाबत ते म्हणाले की, 'एका लाऊडस्पीकरला हात लावलात तर पीएफआय आघाडीवर दिसेल.' आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अशोक नारायण कडलक यांना निवेदनही देण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पीएफआयविरोधात एफआयआर दाखल केली असून, पोलिसांनी हा गुन्हा बेकायदेशीरपणे जमाव जमवल्याप्रकरणी नोंदवली आहे. मशिदींवर लावलेल्या लाऊडस्पीकरविरोधात सुरू असलेल्या मोहिमेचा निषेध करण्यासाठी आज मुंब्रा येथे पीएफआयचे लोक जमले होते आणि मुंब्रा पीएफआयचे अध्यक्ष मतीन शेखानी यांनी आम्हाला छेडले तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा दिला. आयपीसीच्या कलम 188 व्यतिरिक्त, आरोपी अब्दुल मतीन शेखानी आणि 25 ते 30 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT