three actors arrested by mumbai police for shooting adult content SAKAL
मुंबई

Mumbai Police: पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या प्रकरणात आरोपीला २१ वर्षांनी अटक

सकाळ डिजिटल टीम

Kandivli Crime: 2001 मध्ये कांदिवलीमध्ये झालेल्या डबल मर्डर प्रकरणात वॉन्टेड आरोपीला 22 वर्षांनी गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.यशवंत बाबुराव शिंदे असे आरोपीचे नाव असून या प्रकरणात इतर 3 सह आरोपींना पोलिसांनी 2001 मध्येच अटक केली होती.कुरार पोलीस ठाण्यात या दुहेरी खुनाच्या प्रकगणात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी फिर्यादी तक्रारदार जहराबी अब्दुल रेहमान त्याचे पती व मुलीसोबत कांदिवलीच्या क्रांतीनगर परिसरातील हनुमान चाळीत वास्तव्यास होते. तक्रारदार महिलेच्या मुलीचे आरोपी यशवंत शिंदेशी प्रेम संबंध होते.

परंतु मुलीच्या घरातून नात्याला विरोध होता. 12 ऑगस्ट 2001 रोजी आपल्या घरी झोपलेले असताना आरोपी शिंदेने त्याच्या साथीदारासह संगनमत करून पेट्रोल टाकुन फिर्यादी व त्यांचे पती झोपेत असताना आग लावुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

आरोपीचे मुलीशी प्रेम संबंध असताना तीचा विवाह दुसऱ्या मुलाशी ठरविल्याच्या कारणावरून आरोपीने गुन्हा केल्याचे तपासात समोर आले . या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून कुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिडीत पती पत्नी भगवती रुग्णालयात उपचार घेत असताना दोघांचा मृत्यू झाल्याने या गुन्हयात हत्येचे कलम समाविष्ट करण्यात आले.

गुन्हयाच्या तपासात सह आरोपीत मोहिद्दीन चांदपाशा शेख, नागनाथ मोहनराव तेलंगे, व्यंकट बाबुराव पाचावाड यांना अटक करण्यात आली होती . परंतु गुन्हयातील मुख्य आरोपीत यशवंत बाबुराव शिंदे हा पळून गेलेला होता. पाहीजे आरोपीताचा पोलीस ठाणे कडुन तसेच गुन्हे शाखे कडुन सातत्याने शोध सुरू होता.

गुन्हे शाखेच्या कक्ष 12 च्या अधिकाऱ्यांना माहिती प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील पाहिजे मुख्य आरोपी हा सद्या कोंडवा खूर्द, पुणे येथे स्वतः ची ओळख लपवून व वेशांतर करून राहत आहे. तसेच त्याने सदर कालावधीमध्ये स्वतः चे लग्न केले परंतु त्यावेळी त्याने कोणत्याही नातेवाईकांना लग्नासाठी बोलावले नव्हते. तसेच तो घटनेनंतर कधीही त्याचे लातुर येथील मुळ गावी गेला नव्हता, अशी माहिती प्राप्त झाली होती. माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस पथकाने कोंडवा, खूर्द पुणे या परिसरात सलग 24 तास शोध घेवुन आरोपीस ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT