Atal Setu Esakal
मुंबई

Atal Setu: दोन दिवसात अटल सेतू वर प्रवास करणाऱ्या २६४ वाहनचालकांना मुंबई पोलिसांचा दणका; काय आहे कारण?

Atal Setu Bridge Police Action: राज्यातील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू शनिवारपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Atal Setu Bridge Police Action: राज्यातील बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू शनिवारपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पण झाल्यानंतर 'अटल सेतू' शनिवार 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या सागरी मार्गामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर झाला. पहिल्या दोन दिवसांतच पुलावरून लाखो वाहने धावली. मात्र, हा सागरी सेतू पाहण्यासाठी अनेकजण वाहने थांबवून गर्दी करत आहेत. याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

'अटल सेतू'वर विनाकारण वाहने थांबवून सेल्फी काढणाऱ्या २६४ बेशिस्त वाहनचालकांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना देखील पोलिसांनी चांगलाच दणका दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी ‘अटल सेतू’चे उद्‍घाटन करण्यात आले. त्यानंतर तो शनिवारपासून वाहनचालकासाठी खुला करण्यात आला. पहिल्याच दिवशी वाहनचालकांमध्ये या पुलाबद्दल प्रचंड उत्साह होता. शनिवारी मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवास करणारे बहुतांश प्रवाशांनी हा मार्ग पाहण्यासाठी येथून प्रवास केला.

प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालक आणि प्रवाशांनी पुलावर थांबून सेल्फी घेतले. मात्र यावेळी सागरी सेतूवर विनाकारण थांबणे अनेक वाहनचालकांना महागात पडले. २५० वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.

मोटर वाहन कायदा कलम १२२ व १७७ कायद्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकांकडून प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्याचबरोबर, 'अटल सेतू'वर विनाकारण वाहने थांबवून वाहनचालकांनी स्वत:चा आणि दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.

अटल सेतूच्या १० कि.मी. ४०० मीटर एवढ्या हद्दीच्या वाहतूक नियमनाची जबाबदारी मुंबई पोलीस पाहत आहेत. तर उर्वरीत भागाची जबाबदारी नवी मुंबई पोलिसांकडे आहे. रविवारी पोलिसांनी सेतूवरील चालकांना गाडी न थांबवण्याची विनंती केली. त्यानंतरही अनेकजण वाहन थांबवत होते. मुंबई वाहतूक पोलिसांनी सागरी सेतूवर वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी १२० वाहन चालकांवर कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT