police sakal
मुंबई

Mumbai : पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले...पण छमछमचे व्यसन लागले ; पैसे कमवण्यासाठी त्याने केल्या घरफोड्या

खडकपाडा पोलिसांनी केली उच्च शिक्षित चोरट्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेतले, नोकरीला देखील लागला मात्र यादरम्यान रात्री चालणाऱ्या छमछमचे व्यसन त्याला लागले. डान्सबार मध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला. भरदिवसा बंद घरे हेरून घरोफोड्या करायचा.

महिनाभर पोलिसांना गुंगारा देणारा हा तरुण अखेर खडकपाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. रोशन जाधव असे अटक तरुणाचे नाव असून त्याचे 8 गुन्हे पोलिसांनी उघड केले आहेत.

डोंबिवलीतील निळजे गाव येथे रोशन हा राहणारा आहे. या तरुणाने पत्रकारीतीचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हददीत मोहने परिसरात एका घरामध्ये अज्ञात आरोपीने दिवसा घरफोडी चोरी करुन सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते.

याबाबत खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच गेल्या महिनाभरात दिवसा घरफोडी चोरी करण्याच्या घटना परिसरात सतत घडत होत्या, त्याबाबतही पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले होते. दिवसा घरफोडी करुन चोरी करण्याच्या वाढत्या घटनांमुळे परिसरातील लोकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाली होती.

परिसरातील उपलब्ध सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच तांत्रीक कौशल्याच्या आधारे प्राप्त माहितीनुसार गुन्हा घडल्यानंतर पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी 8 एप्रील रोजी शहाड, कल्याण पश्चिम परिसरात सापळा लावुन एका संशईत इसमास शिताफीने ताब्यात घेतले.

या इसमाकडे चौकशी केली असता त्याने ठाणे जिल्ह्यात मोहने, आंबिवली, टिटवाला, शहापुर परिसरात दिवसा घरफोडी चोरी करुन गुन्हे केल्याचे सांगितले. तसेच हा आरोपी दिवसा घरफोडी चोरी करणरा सराईत गुन्हेगार असुन तो वॉचमन नसलेल्या इमारतीत दिवसा एकटा घुसुन घरफोडी करत असे.

अटक आरोपीताकडून नमूद गुन्हयाचे केले तपासात एकूण 8 गुन्हे उघडकीस आणुन त्यातील 47 तोळे (470 ग्रॅम) सोन्याचे दागिने, 1 लॅपटॉप, 1 मोबाईल फोन, दोन महागडी घडयाळ हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान खात्याकडून २ दिवस रेड अलर्ट जारी; ४८ तास धोक्याचे

Petrol and Diesel: जीएसटी रिफॉर्म लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार? दिवाळीनंतर काय महाग होणार?

Latest Marathi News Live Updates : अंधेरी सबवे मागील तीन तासापासून वाहतुकीसाठी बंद

"मग त्याने एकट्यानेच आर्थिक बाजू का सांभाळावी" तेजश्री प्रधानने टोचले आजच्या तरुणींचे कान, म्हणाली...

Pune News : कोथरुड पोलिसांवर आरोप करणाऱ्या तीन तरुणींसह ५ जणांवर गुन्हा दाखल, मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट....

SCROLL FOR NEXT