मुंबई

धारावीत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या दोघांना अटक, 10 जणांवर गुन्हे दाखल

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : धारावी येथे बुधवारी पोलिसांवर दगडफेक केल्याबद्दल 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. परिसरातील गर्दी हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली होती. 

धारावी परिसरात एका राजकीय नेत्याकडून गरीब नागरिकांना जेवण दिले जाते. या भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्यामुळे गर्दीवर विशेष लक्ष ठेवण्याचा आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी दिला होता. त्यामुळे धारावी पोलिसांनी मोकळ्या जागेवर जेवण वाटप करण्यास सांगितले. त्यावरून वाद झाल्यानंतर गर्दीतील काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली. याप्रकरणी धारावी पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे

महत्त्वाच्या बातम्या  : 

25 हजार रुपये किमतीचे 33 हजार मास्क जप्त : 

जेकब सर्कल येथे चढ्या दराने थ्री-प्लाय मास्क विकणाऱ्या एकाला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून आठ लाख 25 हजार रुपये किमतीचे 33 हजार मास्क जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून बेकायदा मास्क विक्रीला चाप लावला आहे. जेकब सर्कल येथे अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या साथीदाराचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

mumbai police arrested 2 people improper behavior with cops at dharavi mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT