मुंबई

सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी बॉलिवूडच्या बड्या कंपनीला दिलेत 'हे' आदेश...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बॉलीवूडमधील बड्या निर्मीती कंपनीने सुशांत सिंग सोबत केलेले कॉन्ट्रॅक्टची प्रत सादर करण्यात पोलिसांनी सांगितले आहे. गुरूवारी याप्रकरणी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसह तिघांचे जबाब नोंदवले. बॉलीवूडमधील एका बड्या कंपनीसोबत अभिनेता सुशांतसिंगचे कॉन्ट्रॅक्ट होते. त्या कंपनीला आता पोलिसांनी या कॉन्ट्रॅक्टची प्रत सादर करण्यास सांगितली आहे. सुशांतच्या आत्महत्येला गटबाजी कारण असल्याचा आरोप नुकताच अनेक कलाकारांनी केला होता. त्या अनुषंगाने तपासाच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे पाऊल म्हणता येईल.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गुरूवारी याप्रकरणी रिया चक्रवर्तीसोबत पब्लिक रिलेशन मॅनेजर व सुशांतचा व्यवसायिक मॅनेजर यांचा जबाब नोंदवला. या दोघांच्याही जबाबात काही विशेष माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

रियाकडून सुशांतबद्दल सविस्तर माहिती घेण्यात आली आहे. गरज पडल्यास तिला शुक्रवारीही बोलवण्यात येईल. सुशांत सिंगप्रकरणी पोलिसांनी बुधवारी कास्टींग डायरेक्टरचा जबाब नोंदवला होता. पोलिसांनी मंगळवारी सुशांतचे वडील व दोन बहिणी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, नोकर अशा 12 जणांचा जबाब नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच डाय-याही हस्तगत केल्या असून त्यांची तपासणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

mumbai police asked to submit contracts done with sushant singh rajput to various bollywood companies

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT