raj kundra
raj kundra  sakal media
मुंबई

राज कुंद्राच्या लॅपटाॅप मध्ये अश्लील चित्रपट, पोलिसांचा हायकोर्टात दावा

सुनिता महामुनकर

मुंबई : पोर्नोग्राफी प्रकरणात (pornography case) अटक केलेल्या उद्योगपती राज कुंद्राच्या (raj kundra) लॅपटॉप मध्ये 51 अश्लील व्हिडीओ चित्रपट (porn movies) सापडले आहेत, असा दावा आज मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai high court) मुंबई पोलिसांकडून (Mumbai police) करण्यात आला. तपासात सहकार्य करण्याच्या नावाखाली कुंद्रा व्हाट्सअॅप चॅट डिलीट (whats app chat) करत होता, असेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले. ( Mumbai police claims fifity one porn movies found in raj kundra laptop to high court-nss91)

अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याचा कंटेंट तयार केल्याच्या आरोपात पोलिसांनी कुंद्रावर फौजदारी दंड संहितेच्या कलम 41 अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी केली अटक बेकायदेशीर असून कुंद्रा तपासात सहकार्य करीत होता, असा दावा करणारी याचिका कुंद्राच्या वतीने एड आबाद पोंडा यांनी केली आहे. तसेच अन्य आरोपी रौयन थौर्पने देखील न्यायालयात याचिका केली आहे. न्या अजय गडकरी यांच्या पुढे आज यावर सुनावणी झाली.

कुंद्राच्या लॅपटाॅप मध्ये हॅाटशॅाट्स आणि बॅालीफेम एपसंबंधित अश्लील चित्रपट सापडले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. तसेच प्रदीप बक्षी या त्याच्या नातेवाईकांने पाठवलेल्या ईमेल मध्ये हाॅटशॅाट बाबत महत्त्वाचे धागेदोरे आहेत, असे ही यावेळी न्यायालयात सांगितले. आणखी एका आरोपीचा लॅपटॉप, सीडीआर, मोबाईल फोन, सॅन डीवाईस, स्टोरेज एरिया नेटवर्क डीवाईस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बक्षीची लंडनमध्ये कैनरेन नावाची कंपनी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच त्यांच्या संभाषणात या व्यवसाय तील आर्थिक तपशीलही आहे, असा दावा यावेळी करण्यात आला.

ज्यावेळी पोलीस त्याच्या कार्यालयाची झडती घेत होते तेव्हा तो आणि थौर्प व्हाट्सअॅप ग्रुपवरील चैट डिलीट करत होते. त्यामुळे पुरावा नष्ट केला जाण्याचा प्रयत्न कुंद्राने केला, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली, असा दावाही प्रमुख सरकारी वकील अरुणा पै कामत यांनी केला. सुनावणी दरम्यान तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे न्यायालयाने सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली. कुंद्रा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता पोलिसांनी अटक केली आणि जप्त केलेला कंटेंट पोर्नोग्राफी कायद्याच्या कक्षेत येत नाही, असा दावा त्याने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT