मुंबई

परांजपे बिल्डर्सना अटक केलेली नाही- मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

पुण्याचे प्रसिद्ध परांजपे बिल्डर्सना गुरूवारी रात्री मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले

विराज भागवत

मुंबई: पुण्यातील नामांकित असलेल्या परांजपे बिल्डर्सच्या दोन बंधूंना काल रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आणि विलेपार्ले पोलिस ठाण्यात आणले. परांजपे बंधूंना (Paranjape builders) फसवणुकी प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai police) ताब्यात घेतल्याची चर्चा होती. फसवणुकी प्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर अमित लुंकडला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. बिल्डर अमित लुंकड सध्या येरवडा जेलमध्ये (Yeravda jail) आहे. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात पुण्यातील प्रसिध्द परांजपे बिल्डर बंधूनां मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतल्यामुळे या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देत त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. (Mumbai Police clarification Paranjape Builder Brothers not arrested called only for Inquiry)

एका ७० वर्षीय महिलेने श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपे या दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने आम्ही परांजपे बंधूंना चौकशीसाठी मुंबईला बोलावून घेतले. त्याला आपण 'अटक' म्हणू शकत नाही. सध्या तपास सुरू आहे. तपासाअंती योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबईचे डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी दिली.

वृद्ध महिलेच्या तक्रारीमध्ये माधव परांजपे आणि राघवेंद्र पाठक या दोघांचीदेखील नावं आहेत. अशाच प्रकारची एक तक्रार त्यांच्याविरोधात जानेवारी २०२० मध्ये दाखल झाली होती. त्या तक्रारीचादेखील तपास सुरू आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, काल रात्री श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे यांना विले पार्ले पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यांच्याविरोधात विले पार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंदरा डोंगरे (७०) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमानव्ये गुन्हा नोंदविलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT