मुंबई

Mumbai Police Commissioner: मुंबई पोलिस आयुक्त पद आणि वाद

अनिश पाटील

मुंबईः  मुंबई पोलिस आयुक्त पद हे राज्यातील सर्वात मानाचे पद समजले जाते. पण ही खुर्ची जेवढी मानाची आहे, तेवढीच काटेरी आहे. या पदावर झालेल्या वादानंतर अनेक दिग्गज अधिका-यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे. या यादीत सुपरकॉप राकेश मारिया, डॅशिंग अधिकारी अरुप पटनायक यांच्यासह आता परमबीर सिंग यांचेही नाव जोडले गेले आहे.

राज्याचे सत्ताकेंद्र आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा पोलिस आयुक्त बनण्याचे स्वप्न प्रत्येक आयपीएस अधिकारी ऊराशी बाळगून असतो. या पदाची लेगसी मोठी आहे. ज्युलिओ रिबेरो, डी.एस सोमण, वसंत सराफ, रॉनी मेंडोसा सारख्या अधिका-यांनी या पदाची उंची आणखी वाढवली. पण मुंबई पोलिस आयुक्त पद एक काटेरी मुकुट आहे. कारण हा अधिकारी सत्ताकेंद्र असलेल्या नेत्यांच्या नेहमी जवळ असतो. त्यामुळे त्याचे वादही सत्तेच्या दरबारी लवकर पोहोचतात. त्यामुळे काही दिग्गज अधिका-यांना तडकाफडकी बदलीला सामोरे जावे लागले. 

मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंगही  त्याला अपवाद ठरले नाही. परमबीर सिंग यांना अंबानी स्फोटक प्रकरणं भोवले. पण परमबीर सिंग हे या यादीतील पहिले नाव नाही. यापूर्वी सुपर कॉप राकेश मारिया यांनाही शीना बोरा प्रकरणानंतर तडकाफडकी पदोन्नती देऊन या पदावरून हटवण्यात आले. याशिवाय डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेल्या अरुप पटनायक यांनाही आझाद मैदान दंगलीनंतर बदलीला सामोरे जावे लागले होते. पण ही यादी तेवढीच नाही. 1992 च्या दंगलीनंतर पोलिस आयुक्तांची बदली करून सामरा यांना आणण्यात आले होते. पण पोलिस आयुक्त पदाच्या इतिहासात कोणत्याही घटनेने सर्वाधिक अधिका-याचा बळी घेतला असेल, तर ते तेलगी प्रकरण. तेलगी प्रकरणं भोवलेले आरएस शर्मा त्यावेळी महासंचालक पदाच्या स्पर्धेत होते. पण या गैरव्यवहारामुळे सर्वच स्वप्न धुळीला मिळाले.

----------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Police Commissioner post and disputes here the details

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT