मुंबई

Mumbai: आधी चिठ्ठीत पत्नीवर केले आरोप, मग पोलीस शिपायाने संपवले जीवन, त्या नोटमध्ये नक्की काय लिहीलयं ?

Vadala: वडाळा टीटी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी - तपास सुरू केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Police: मुंबईशाहू नगर पोलीस ठाण्यात शिपाई पदावर नियुक्त विजय साळुंखे( ३८) यांनी प्रतीक्षा नगर येथील राहत्या घरी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी साळुंखे यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून त्यात पत्नीच्या जाचास कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत आहे, असा आरोप नमूद आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत चौकशी - तपास सुरू केला आहे.

साळुंखे यांनी मृत्यूपूर्वी केलेल्या आरोपांबाबत चौकशी सुरू आहे. त्यात तथ्य आढळल्यास त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा नोंद होऊ शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

साळुंखे ३० मेपासून कर्तव्यावर गैरहजर होते. त्यांना यकृताशी निगडित आजार होता. त्यावर उपचारही सुरू होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून वडाळा टी टी पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT