crime esakal
मुंबई

Mumbai: आयआयटी विद्यार्थी दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात एसआयटीकडून एक आरोपी विद्यार्थी अटकेत

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला दर्शन सोळंकीची जी सुसाइड नोट मिळाली होती ती सुसाईड नोट दर्शन सोळंकीनेच लिहिले असल्याचे हस्ताक्षर तज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटी पथकाने दर्शन सोळंकी सोबत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला रविवारी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या वर्गमित्राचे नाव अरमान इकबाल खत्री आहे.

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाला दर्शन सोळंकीची जी सुसाइड नोट मिळाली होती ती सुसाईड नोट दर्शन सोळंकीनेच लिहिले असल्याचे हस्ताक्षर तज्ञांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीन आतापर्यंत दोघांचे जबाब नोंदवले आहेत.

चिठ्ठीत नमूद विद्यार्थ्याची चौकशी

दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने चिठ्ठीत नाव नमुद असलेल्या विद्यार्थ्याची चौकशी केल्याची माहिती मिळत आहे. दर्शन सोळंकीने यावर्षी 12 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती.

त्यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी दर्शन सोळंकीने काही दिवसांपूर्वी त्याच्याशी झालेल्या वादासंदर्भात आपली माफी मागितल्याचे या विद्यार्थ्याने चौकशीत एसआयटी पथकाला सांगितले असल्याची माहिती मिळत आहे.

पण या दोघांमध्ये नेमका कशावरून वाद झाला याची माहिती या विद्यार्थ्याने दिलेली नाही. दरम्यान, सदर विद्यार्थी चौकशीत माहिती देत नसल्यामुळे त्याची लाय डिटेक्टर चाचणी करण्याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे .

मित्राचा सल्ला

विशेष तपास पथकाने या प्रकरणी उदय सिंह मिना नावाच्या व्यक्तीचाही जबाब नोंदवला. एका विद्यार्थ्याला दर्शन सोळंकी याच्या जातीबाबत कळाल्यानंतर त्याने आपल्याशी बोलणे बंद केल्याचे दर्शनने मिना याला सांगितले होते.

त्यावेळी मिनाने त्याला समजावले होते. तसेच संबंधित मित्र बोलत नसेल, तर जाऊ दे, तू दुसऱ्या मित्रांसोबत बोलत जा, असे समजल्यावल्याचे मिना याने एसआयटी पथकासमोर दिलेल्या जबाबात म्हटले आहे

दर्शनच्या पालकांचे आक्षेप

दर्शन सोलंकीच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा त्याचे वडील, बहीण आणि आत्या यांनी एसआयटीने शोधलेल्या दर्शनच्या सुसाईड नोटवर आक्षेप घेतला.

सुसाईड नोटवरील हस्ताक्षर दर्शनसारखे दिसत नसल्याचा दावा दर्शनच्या वडिलांनी बहिणीने आणि आत्याने केला. फक्त त्याच्या आईने पूर्वी सांगितले होते की हस्ताक्षर त्यांच्या मुलासारखे दर्शनसारखे दिसत असल्याचे सांगितले होते.

अट्रोसिटीच्या तरतुदीप्रमाणे गुन्ह्याची नोंद

दर्शन सोळंकीने आयआयटी वसतिगृहाच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्यानंतर दीड महिन्यानंतर पवई पोलिसांनी 29 मार्चला अज्ञाताविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आणि अट्रोसिटी कायद्या कलमान्वये गुन्हा नोंदवला.

29 मार्चला दर्शनचे आई-वडील कुटुंबातील इतर सदस्य आणि वकिलासमवेत पवई पोलिस स्टेशनला पोहोचले. त्यांनतर पवई पोलिसांकडून त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आणि गुन्हा नोंदवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: झीशान सिद्दीकींच्या उमेदवारीमुळे वाद पेटला; एक बडा नेता शिवसेनेकडे वळला? तर दुसरा दुखावला, राष्ट्रवादीत बंडाची चाहूल!

Mamata Banerjee Exit Poll Reaction : ममता बॅनर्जींचा मोठा दावा! 'एक्झिट पोल्स' पुन्हा एकदा फेल ठरणार; तृणमूल काँग्रेसला मिळणार 226 पेक्षा जास्त जागा

Latest Marathi News Live Update : तरुण कुमार हत्या प्रकरणातील आरोपीच्या घराचा अनधिकृत भाग MCD ने पाडून टाकला

हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणाऱ्या, शिवछत्रपतींच्या तीर्थरुपांची गोष्ट रुपेरी पडद्यावर ! ‘शहाजीराजे’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

Mumbai Watermelon Deaths : कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू? पायधुनीतील घटनेनंतर कलिंगड विक्रीत 50 टक्क्यांनी घट; भीतीपोटी ग्राहकांनी फिरवली पाठ

SCROLL FOR NEXT