Mumbai saakl
मुंबई

Mumbai : 'इन्स्टा रिल' पायी गमावला जीव? डोंबिवलीजवळ रेल्वेची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू

रेल्वे प्रशासना कडून रेल्वे रूळ ओलांडू नका असे वारंवार आव्हान करण्यात येते. मात्र तरीही अनेक नागरिक आज ही जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडणे, काही तरुण सोशल मीडियावर रील बनविण्यासाठी रेल्वे रुळांवर येत असतात.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेची धडक बसल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. हे तरुण रेल्वे रूळ क्रॉस करत असावे किंवा रील बनविण्यासाठी रेल्वे रुळांवर गेले असावे असावे, आणि रुळांवर गाडीचा अंदाज न आल्याने त्यांचा रेल्वे ची धडक बसून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वे पोलिसांनी लावला आहे.

या घटनेची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मुलांचे मृतदेह शव विच्छेदनसाठी रुक्मिणी बाई रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील दिवा, कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे.

रेल्वे प्रशासना कडून रेल्वे रूळ ओलांडू नका असे वारंवार आव्हान करण्यात येते. मात्र तरीही अनेक नागरिक आज ही जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडणे, काही तरुण सोशल मीडियावर रील बनविण्यासाठी रेल्वे रुळांवर येत असतात.

सोमवारी सायंकाळी 5.30 च्या दरम्यान एका दुर्घटनेत दोन तरुणांना आपला जीव गमावला आहे. चेतन गोगावले (वय 22) आणि सुयोग उत्तेकर (वय 25) अशी दोघांची नावे असून दोघे ही डोंबिवली पूर्वेतील रहिवासी आहेत. ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे ची धडक या तरुणांना बसली. त्यांच्या

डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्यांना त्वरित शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या दोन्ही तरुणांचे मृतदेह त्यांच्या परिवारा कडे देवून कल्याण मधील रुक्मीणीबाई हॉस्पिटल पंचनामासाठीपाठविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Rain: मराठवाड्यात पावसाचा कहर! चार महिन्यांत जवळपास हजार मिलिमीटर पाऊस! मराठवाड्यात यंदा पावसाने सर्व विक्रम मोडले

Hinjewadi Traffic: हिंजवडी परिसरात वाहतूक कोंडीवर उपाय! पुणे बंगळूर महामार्गावरील जड वाहनांना ठराविक वेळेत प्रवेशबंदी

Manoj Jarange: जरांगे यांचा काँग्रेसनंतर राष्ट्रवादीवर घणाघात; अजित पवार यांचे नेते आरक्षणविरोधी असल्याची टीका

Karad Ward Reservation: 'कऱ्हाडमध्ये भल्याभल्यांचा पत्ता कट'; काही प्रभागांत नवखे उतरणार मैदानात; अनेकांच्या सौभाग्यवतींना संधी

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट! ‘या’ महिलांना मिळणार नाही दिवाळीचा हप्ता; लाडक्या बहिणींच्या ‘ई-केवायसी’ला ब्रेक, तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद

SCROLL FOR NEXT