mumbai police Team eSakal
मुंबई

मुंबई पोलिसांना ७५० रुपयांची दिवाळी भेट ; कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

अत्यावश्यक सेवेतील या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीनिमीत्त भेट देण्यात आली.

सुधीर काकडे

कोरोना काळात अत्यावशक सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या जिकरीनं आपलं कर्तव्य पार पाडलं. अत्यावश्यक सेवेतील या सर्व कर्मचाऱ्यांना सरकारकडून दिवाळीनिमीत्त भेट देण्यात आली. यामध्ये सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरुपात बक्षीस दिलं. मात्र ही दिवाळी भेट देताना सरकारने मुंबई पोलिसांची मात्र चेष्ठा केल्याचं पहायला मिळतं आहे.

कोरोना काळात दिवस रात्र नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून कायदा व सुवस्थेचं काम करणाऱ्या मुंबई पोलिसांना सरकारने दिवाळी निमीत्त चक्क ७५० रुपये दिल्यानं या कर्मचाऱ्यांची निव्वळ चेष्टा केल्याचं दिसतं आहे. सरकारने दिलेल्या ७५० रुपयांमुळे पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे. मुंबई पोलिसांना दिवाळी भेट म्हणून सबसिडी कँटिनमधून त्यांच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या डेबिट व क्रेडिट कार्डवर ७५० रुपये रकमेची खरेदी विनामुल्य करता येणार आहे.

पोलीस कल्याण निधीतून सर्व पोलिसांना ही भेट दिले जाणार आहे. मात्र त्यावरील पैसे त्यांना खिशातून द्यावे लागणार असल्याचं पत्र पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे काढण्यात आले आहे. एकीकडे पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकिय कर्मचार्यांना भरगोस दिवाळी बोनस दिला जात असताना पोलिसांना मात्र ७५० रुपये दिवाळी भेट देऊन त्यांची चेष्ठा केल्याची चर्चा पोलिस दलात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR voter list: देशातील 42 निवृत्त न्यायमूर्तींचं खुलं पत्र! SIR वरुन सुरु असलेल्या वादावर स्पष्ट केली भूमिका

India Alliance Protest : 'देश हायजॅक केलाय, लोकशाहीची हत्या सुरूय'; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, आंदोलनासाठी 300 खासदार राजघाटावर

NANA PATEKAR: नाना पाटेकर रोज ६० सिगारेट ओढायचे; वयाच्या ५६व्या वर्षी सोडली सवय, पण हृदयाला झालेलं नुकसान भरून निघतं का? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update: उदगीरमध्ये भरदिवसा दोन घरांवर डल्ला; सहा लाखांचा ऐवज लंपास

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

SCROLL FOR NEXT