Mumbai Crime sakal
मुंबई

Mumbai Crime: ट्रॉम्बे-गोरेगावमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 7 तरुणींची सुटका

पोलिसांची मोठी कारवाई: ट्रॉम्बे आणि गोरेगावातील वेश्याव्यवसायाचा भांडाफोड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता 13: ट्रॉम्बे आणि गोरेगाव परिसरात चालणाऱ्या 2 वेगवेगळ्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी 2 महिलांसह एका दलालास पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 7 तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली आहे.

पहिल्या कारवाईत ट्रॉम्बे परिसरात राहणारी महिला आरोपी प्रियांका ही सेक्स रॅकेट चालवत असून, मागणीनुसार काही तरुणींना विविध हॉटेल, लॉज आणि गेस्ट हाऊसमध्ये वेश्याव्यवसायासाठी पाठवित असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांना मिळाली होती.

या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने प्रियांकाला संपर्क साधला होता. ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारी 2 वाजता प्रियांका 4 तरुणीसोबत तिथे आली होती. याच दरम्यान पोलिसांनी तिथे कारवाई करुन प्रियांकासह इतर तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यानंतर प्रियांकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली.

दुसऱ्या कारवाईत बांगुरनगर पोलिसांनी कनिका नावाच्या एका 62 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेसह दलाल नरेशकुमार बेचेन दांगी या दोघांना अटक केली, तर तीन तरुणींची सुटका केली. कनिका ही गोरेगाव परिसरात राहत असून, ती तिच्या राहत्या घरी सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे बोगस ग्राहक पाठवून त्याची शहानिशा केली होती.यानंतर बंगुर नगर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक करत तरुणींची सुटका केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT