jitendra awhad- ghoda maza ladka sceme Sakal
मुंबई

Jitendra Awhad : घोडा माझा लाडका! डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची मिश्कील टीप्पणी

मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे नेते आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : मुंबई पोलीस दलात पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे नेते आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. "घोडा माझा लाडका" अशी नवीन योजना आली असल्याचे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रिटीश काळात मुंबई पोलिस दलात अश्वदल कार्यरत होते. काळानुसार हे दल बंद करण्यात आले होते. मात्र, आता हे पथक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी विनोदी शैलीत भाष्य केले आहे.

"आज बातमी आलेय की, मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार! पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते. आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीतून समजले.

आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी 'खेचरं' येतील. जिथे माणसांना चालायला जागा नाही; तिथे घोडे कुठे नेणार आहेत? निर्णय घेता येतो, म्हणून असा निर्णय घ्यायचा ? ही नवीन योजना आहे, " माझा लाडका घोडा" आणि हो, हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील; तेव्हा त्यांच्या मागे कुत्रे लागतील ते वेगळेच!!" , अशी एक्स पोस्ट डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी करून सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! झेडपी, मनपा, नगरपालिकांच्या शाळांमध्ये नेमले जाणार अंशकालीन निदेशक; दरमहा १८ हजार मानधन; शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार; पटसंख्येची अट अशी...

Weekend Special Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवंय? ट्राय करा पनीर बेसन चिला; चव अशी की एकदा खाल्ल्यावर रोज बनवाल

WPL 2026 Prize Money: विजेत्या RCB ला अन् उपविजेत्या दिल्लीला किती कोटींचं बक्षीस? पुरस्कार विजेत्या खेळाडूही मालामाल

ढिंग टांग : पुणे-मुंबई: एक थरारयात्रा..!

अग्रलेख : द्रुतगती छळमार्ग!

SCROLL FOR NEXT