paise sakal
मुंबई

Mumbai : 100 कोटी गुंतवणुकीची ऑफर ...लाखोंची फसवणूक...आरोपी जोडपे फरार

पोलिसात दाखल तक्रारीनुसार जुलै 2022 साली पिडीत तक्रारदाराची या जोडप्याशी त्याच्या व्यावसायिक भागीदार आणि बांधकाम कंपनीच्या मालकाच्या उपस्थितीत पहिल्यांदा भेट झाली. या जोडप्याने बांधकाम कंपनीच्या आगामी प्रकल्पासाठी 12 ते 13.5% व्याजदराने 100 कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी देण्याची ऑफर दिली .

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - 100 कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी उपलब्ध करून देण्याची खोटी ऑफर देऊन 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका रिअल इस्टेट एजंटने एका जोडप्याविरुद्ध बांगुर नगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर बांगूर नगर पोलिसांनी आरोपी जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या जोडप्याने अशाच प्रकारे अनेकांची फसवणुक केल्याची माहिती मिळत आहे. बांगुर नगर पोलिस आरोपी जोडप्याचा शोध घेत आहेत.

पोलिसात दाखल तक्रारीनुसार जुलै 2022 साली पिडीत तक्रारदाराची या जोडप्याशी त्याच्या व्यावसायिक भागीदार आणि बांधकाम कंपनीच्या मालकाच्या उपस्थितीत पहिल्यांदा भेट झाली. या जोडप्याने बांधकाम कंपनीच्या आगामी प्रकल्पासाठी 12 ते 13.5% व्याजदराने 100 कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी देण्याची ऑफर दिली .

तसेच 45 दिवसांत कर्ज वाटप केले जाण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रक्रिया शुल्क आगाऊ भरावे लागेल अशी मागणी जोडप्याने केली. त्यांनी बांधकाम कंपनीच्या मालकाशी एक सामंजस्य करार पुरावा म्हणून दाखवला आणि त्याच्यावर विश्वास ठेवत रिअल इस्टेट एजंटने प्रक्रिया शुल्क म्हणून 10 लाख रुपये जोडप्याला दिले.

परंतु रिअल इस्टेट एजंटला कर्जाचे पैसे बरेच दिवस मिळाले नाही.नंतर जोडप्याला कर्जबद्दल विचारले असता त्यांनी सबबी सांगायला सुरुवात केली परंतु कथित कर्जाचा निधी दिला नाही. त्यानंतर रिअल इस्टेट एजंटला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्याने पोलिसांकडे धाव घेत गुन्ह्याची नोंद केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT