mumbai police Sakal
मुंबई

Mumbai : मुंबईत पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू; जाणून घ्या कारण

मुंबई पोलिसांकडून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबईत पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश पोलिसांकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधीत कुठल्याही प्रकारे एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७ नुसार लागू करण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक आदेशामुळं पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. त्याचबरोबर कुठल्याप्रकारच्या मिरवणुका काढता येणार नाहीत. त्याचबरोबर या मिरवणुकांमध्ये फटाके फोडणे, लाऊडस्पीकर्स लावणे आणि म्युझिक बँडला देखील बंदी असेल. यामध्ये लग्न समारंभ आणि अत्यंयात्रा यांना वगळण्यात आलं आहे.

नागरिकांमध्ये संभ्रम

मुंबई अशा प्रकारे प्रतिबंधात्मक आदेश कशासाठी लागू करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी अद्याप सविस्तर खुलासा केलेला नाही. त्यामुळं मुंबईक नागरिक संभ्रमात असून ट्विटरवरुन ते याबाबत सवाल विचारत आहेत. कुठल्या कारणासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत? अशी विचारणा ते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT