Police Video Sakal
मुंबई

Police Video : मुंबई पोलिसांना सलाम! धोधो पाऊस, 5 महिन्यांचं बाळ अन् हैराण झालेल्या महिलेला मदत

"त्यांच्या मुलाचा आनंद हे त्यांचे स्वतःचे विधान आहे. आमचे शब्द त्याचे योग्य वर्णन करू शकत नाहीत. धन्यवाद!" असा रिप्लाय मुंबई पोलिसांनी या महिलेच्या पोस्टला केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गणेशोत्सवामुळे सध्या पुणे, मुंबई आणि इतर मुख्य शहरात गणेशभक्तांची गर्दी आहे. मुंबई आणि पुण्यात लक्षणीय गर्दी दिसून येते. या गर्दीमुळे अनेकदा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असाच एक प्रकार मुंबईत एका महिलेसोबत घडला असून पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनामुळे मुंबईत गर्दी असताना टॅक्सी चालक हव्या त्या ठिकाणी सेवा देण्यास नकार देत होते असं या महिलेने सांगितलं आहे.

तिच्याकडे तिचा पाच महिन्यांचा मुलगा होता, तो रडत होता पण घरी जाण्यासाठी टॅक्सीवाला येत नव्हता. बऱ्याच वेळापासून ही महिला टॅक्सीला थांबवण्याचा प्रयत्न करत होती पण टॅक्सीवाला कुणीच थांबत नव्हता त्यामुळे ती हैराण झाली होती. गर्दी खूप असल्यामुळे टॅक्सीवाले येत नसल्याचं पाहून मुंबई पोलिसांनी या महिलेला मदत केली आणि तिला आपल्या गाडीत बसवून तिच्या घरी सोडले. ही घटना सदर महिलेने 'एक्स'वर पोस्ट केली आहे.

"आम्ही चर्नी रोड स्टेशनवर होतो, पाऊस पडत होता. माझा 5 महिन्यांचा मुलगा रडत होता आणि गणेश विसर्जनामुळे कोणताही टॅक्सी ड्रायव्हर यायला तयार नव्हता. पण मुंबई पोलिसांनी आम्हाला घरी पोहोचण्यात मदत केली. त्यांचे मनःपूर्वक आभार. जय हिंद जय महाराष्ट्र!" अशी पोस्ट अमन वोरा या अकाऊंटवरून करण्यात आली आहे.

तर "त्यांच्या मुलाचा आनंद हे त्यांचे स्वतःचे विधान आहे. आमचे शब्द त्याचे योग्य वर्णन करू शकत नाहीत. धन्यवाद!" असा रिप्लाय मुंबई पोलिसांनी या महिलेच्या पोस्टला केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT