Mumbai Police Tribute Chandrayaan 3 eSakal
मुंबई

Mumbai Police Tribute : 'चांद्रयान-3'च्या यशाबद्दल मुंबई पोलिसांचं खास म्युझिकल ट्रिब्युट; पाहा व्हिडिओ

Chandrayaan 3 : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने नवीन विक्रम केला आहे.

Sudesh

ISRO Moon Mission : चांद्रयान-3 मोहीम यशस्वीपणे पार पाडून भारताने नवीन विक्रम केला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. या यशाबद्दल इस्रो आणि भारताचं जगभरातून कौतुक होत आहे. मुंबई पोलिसांनी देखील आपल्या खास शैलीमध्ये इस्रोचं कौतुक केलं आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये पोलिसांच्या 'खाकी स्टुडिओ' बँड पथकाने इस्रोच्या वैज्ञानिकांना एका गाण्याच्या माध्यमातून ट्रिब्युट दिलं आहे.

"मोठ्या अचीव्हमेंटसाठी मोठं ट्रिब्युट! आम्ही आमच्या भावना सध्या शब्दांमध्ये मांडू शकत नाही, त्यामुळे आम्ही संगीताचं माध्यम वापरत आहोत. एवढी मोठी कामगिरी पार पाडल्याबद्दल, मुंबई पोलीस बँड - खाकी स्टुडिओचं इस्रोला हे ग्रँड ट्रिब्यूट! आम्हाला तुम्हा सगळ्यांचा अभिमान आहे!" अशा आशयाची पोस्ट मुंबई पोलिसांनी केली आहे.

व्हायरल होतोय व्हिडिओ

24 ऑगस्टला पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला दहा हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. एक्स यूजर्स मोठ्या प्रमाणात या व्हिडिओवर कमेंट करुन मुंबई पोलिसांचं कौतुक करत आहेत.

पोलीस बँडच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचे सुप्त गुण समोर येत आहेत. आपल्या कामासोबतच ते इथेही कमी नाहीत; असं एका यूजरने म्हटलं आहे. तर हे अतिशय सुंदर ट्रिब्युट असल्याचंही कित्येक यूजर्सनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Solapur: पक्षशिस्तीचा भाजपचा दणका! प्रशिक्षण शिबिराला गैरहजर २९ नगरसेवकांना नोटिसा; मंगळवारपर्यंत खुलासा मागवला

जरांगेंनी तिसऱ्यांदा मागितली परवानगी, फक्त ५० जण, वेळ पाळणार आणि शांततेत आंदोलन; मुंबई पोलिसांना दिलं हमीपत्र

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ; अंतरवाली सराटी ते मुंबई प्रवासात विशेष सुरक्षा पथक तैनात

Latest Marathi News Update : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBIचा FIR; ठाकरे पिता-पुत्रांसह रिया चक्रवर्ती, डिनो मोरिया यांच्या चौकशीची मागणी

Rishi Panchami 2026: ऋषिपंचमीला नांगर न लागलेल्या रानभाज्यांचा नैवेद्य का दाखवला जातो? जाणून घ्या धार्मिक अन् वैज्ञानिक कारण!

SCROLL FOR NEXT