मुंबई पोलिसांनी शुक्रवारी 28 ऑक्टोबरला मुंबईतील जे घरमालक आपली जागा भाड्याने देऊ इच्छित आहेत अशा घर मालकांसाठी एक सूचना जारी केली आहे.
मुंबई - मुंबई पोलिसांनी शुक्रवारी 28 ऑक्टोबरला मुंबईतील जे घरमालक आपली जागा भाड्याने देऊ इच्छित आहेत अशा घर मालकांसाठी एक सूचना जारी केली आहे. मुंबईचे पोलिस उपायुक्त संजय लाटकर यांनी परिपत्रकाद्वारे हा आदेश जारी केला आहे. हा आदेश 6 नोव्हेंबर 2022 पासून अंमलात येईल. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता, 1860 च्या कलम 188 अंतर्गत दंडनीय असेल.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोणत्याही घरमालकाला आपल्या घरात भाडोत्री ठेवण्यापूर्वी घरमालकाने तत्काळ घर भाड्याने घेणाऱ्या व्यक्तींचा तपशील पोलिसांना सादर करावा. मुंबई पोलिसांच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन तपशील देता येईल. आदेशात पुढे म्हटले आहे की, भाड्याने घर दिलेली व्यक्ती परदेशी असेल, तर घरमालकाने परदेशी व्यक्तीचे नाव, राष्ट्रीयत्व, पासपोर्ट तपशील जसे की पासपोर्ट क्रमांक, ठिकाण, जारी करण्याची तारीख आणि वैधता सादर करावी. व्हिसा तपशील उदा व्हिसा क्रमांक, श्रेणी, ठिकाण आणि जारी करण्याची तारीख, वैधता, नोंदणी ठिकाण आणि शहरात राहण्याचे कारण याची माहिती सुद्धा पोलिसांना द्यावी.मुंबई पोलीसानी सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.