मुंबई

मास्क न वापरणाऱ्यांना पोलिसांनी केला कोंबडा, पाहा व्हिडीओ

शर्वरी जोशी

सध्या महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली आहे. पुणे, मुंबई या सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या काळात मास्क वापरणे सक्तीचं करण्यात आलं आहे. मात्र, तरीदेखील अनेक जण परिस्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता मास्क वापरायचं टाळत आहेत. म्हणूनच, आता मास्क न वापरता कोणतीही व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. यामध्येच मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर एक भन्नाट कारवाई केली आहे.  या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ही शिक्षा पाहून अनेकांना हसू अनावर झालं आहे.

मुंबई पोलीस कायमच त्यांच्या अनोख्या ट्विटमुळे चर्चेत येत असतात. मात्र, यावेळी त्यांनी दिलेल्या शिक्षेमुळे ते चर्चेत आले आहेत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर मास्क न लावता फिरणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी कोंबडीप्रमाणे चालण्याची शिक्षा दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही तरुण मरीन ड्राइव्हवर मास्क न घातला फिरत होते.या तरुणांना पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांना शिक्षा म्हणून संपूर्ण रस्त्यावर मुर्गावॉक करण्यास सांगितलं.

दरम्यान,  नियमांचं पालन न केल्यास अशाच प्रकार शिक्षा होईल, असं म्हणत मुंबई पोलिसांनी हे ट्विट शेअर केलं आहे. तसंच हे ट्विट आतापर्यंत अनेकांनी शेअरदेखील केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT