road safety Taarak Mehta Ka Ooltah Chashmah mumbai police twitter account
मुंबई

मुंबई पोलिसांकडून 'तारक मेहताच्या उलटा चष्मा'द्वारे Road Safety चे सोपे संदेश

मुंबई पोलिसांचा रस्त्याच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी अनोखा मार्ग; 'तारक मेहता का उल्टा चष्मा' लोकप्रिय पात्रांची मदत

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

मुंबई : मुंबई पोलिस सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळंत. मुंबई पोलिसांच्या ट्वीटर आणि इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवर लाखो फॉलोवर्स आहेत. पोलिसांच्या सोशल मीडियावरील नुकत्याच पडलेल्या पोस्टनुसार रस्त्याच्या सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील कलाकारांची मदत घेतली आहे.

मुंबई पोलिसांच्या इंस्टाग्राम आणि ट्वीटर पोस्टनुसार त्यांनी वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन वेगवेगळ्या संदेशाचे पोस्टर बनवून सोशल मीडियावर पोस्ट करुन जनजागृती करण्याचं काम करत आहेत. वाहतूकीचे सोपे संदेश ही टॅगलाईन देऊन ही पोस्ट त्यांनी केली आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी या मालिकेतील तारक मेहताच्या चिडचिड करणाऱ्या बायकोचा फोटो लावून त्यावर एक संदेश लिहीला आहे. या संदेशात त्यांनी हेल्मेटशिवाय गाडी चालवू नका असा संदेश दिला आहे. त्याचबरोबर विनाकारण हॉर्न वाजवू नये. दारू, मद्यपान करुन वाहने चालवू नये, परवाना नसताना वाहने चालवू नयेत. असे संदेश वेगवेगळ्या कलाकारांना घेऊन वेगळ्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत.

या माध्यमातून मुंबई पालिसांची जनजागृती करण्याची पद्धत लोकांना आवडत असून त्यांच्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांनी या पोस्ट शेअर केल्या आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून जनजागृतीसाठी चांगला मार्ग निवडला गेला आहे अशा कमेंट करत लोकांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT