mumbai esakal
मुंबई

मोठी कारवाई; मुंबई पोलिसांनी जप्त केला ३८ किलोचा गांजा

आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ८ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांना सांगितले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने आज एक मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील घाटकोपर युनिटने ३८ किलोचा गांजा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी नुकतीच या घटनेची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ८ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

घडलेली घटना अशी, घाटकोपरच्या वैतागवाडी येथील पीडब्ल्यूडी सिमेंट गोडाऊन येथून हे दोन्ही आरोपी गांजाच्या गोणी घेऊन जात होते. त्यांच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना हटकले चौकशी आणि अंग झडतीत त्याच्याजवळ हे अंमली पदार्थ आढळून आले. दुसरीकडे अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान युनिटने ५ लाख ७० हजाराचे एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आयुब खान असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा धारावीचा राहणारा आहे. आयुबवर तो राहत असलेल्या शाहू नगर पोलिसांच्या हद्दीत मारामारी व इतर गुन्ह्यांत सहभागी असल्याचेही गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी अंमली पदार्थ विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT