Mumbai Police Threat Call Esakal
मुंबई

Mumbai Police Threat Call: धमक्यांचे सत्र सुरूच! ताज हॉटेल, मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा पोलीस कंट्रोल रुमला फोन

Mumbai Police Threat Call: काही दिवसांपूर्वी शाळा, एअरपोर्ट, हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यासह देशभरात ईमेल, फोनच्या माध्यमातून धमक्या दिल्या जाण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीयेत. काही दिवसांपूर्वी शाळा, एअरपोर्ट, हॉस्पिटल्सना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हॉटेल आणि मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे.

आज दुपारी पोलिसांना हा फोन आला, अशी माहिती आहे. धमकीचा फोन आल्यानंतर तातडीने मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी फोन आला त्या व्यक्तीचे लोकेशन तपासले असता हा फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

त्याचबरोबर ज्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याची माहिती फोनवरून देण्यात आली आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. या फोननंतर पोलीस सतर्क झाले आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

दरम्यान काही दिवसांपुर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आणि गृह मंत्रालय बिल्डिंगमध्ये शोध मोहिम चालवण्यात आली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आले नाही. इतकेच नाही तर हा ईमेल कोणी पाठवला आणि कुठून पाठवला याचा देखील तपासले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT