Mumbai Police esakal
मुंबई

Mumbai Police : मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन... दहा दिवसात तिसरी धमकी

पोलिसांनी टँकर ताब्यात घेऊन तपासणी केली असता टँकरमध्ये संशयास्पद काही सापडले नाही.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.रविवारी मुंबई पोलीसांच्या कंट्रोल रूमला एका अज्ञाताकडून फोन आला. फोनवर अज्ञात व्यक्तीने रत्नागिरी येथे मुंबई गोवा महामार्गावर स्फोटक असलेला टँकर जात असल्याची माहिती दिली. पोलिसांनी टँकर ताब्यात घेऊन तपासणी केली असता टँकरमध्ये संशयास्पद काही सापडले नाही. टँकरचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. या नाकाबंदी दरम्याने सदर टँकर हा संगमेश्वर येथे नाकाबंदी दरम्याने थांबविण्यात आला.

टँकरची सर्व बाजूने पोलिसांमार्फत तपासणी करण्यात आली. तसेच बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे देखील कसून प्राथमिक तपासणी करण्यात आली.या तपासणी दरम्याने संशयित टँकर मध्ये कोणतीही बॉम्ब अथवा बॉम्ब सदृश वस्तू अगर स्फोटक पदार्थ मिळून आलेले नाहीत.सध्या मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

दहा दिवसात तिसरी धमकी

मुंबईत दहशतवादी कट रचण्याच्या धमकीची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा धमक्या पोलिस नियंत्रण कक्षाला येत आहेत.गेल्या दहा दिवसांतील ही तिसरी धमकी आहे. तीन दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण कक्षालाही मुंबईत घातपाताची धमकी मिळाली होती.

धमकी देणाऱ्याने 26/11 सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा मुंबईत घडवून आणला जाईल, असे म्हटले होते. एवढेच नाही तर या मेसेजमध्ये एका अज्ञात व्यक्तीने योगी आदित्यनाथ यांचे सरकार आणि यूपीमधील मोदी सरकार निशाण्यावर असल्याची धमकी दिली होती. काही ठिकाणी काडतुसे आणि एके 47 पोहोचल्याचेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT