मुंबई

प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: आणखी एका नामांकित बिल्डरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. परांजपे बंधूंना (Paranjape builders)फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी (mumbai police) ताब्यात घेतले आहे. फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांनी बिल्डर अमित लुंकडला दोनच दिवसांपुर्वी अटक केली आहे. बिल्डर अमित लुंकड सध्या येरवडा जेलमध्ये (yerwada jail) आहे. दरम्यान, पुण्यातील प्रसिध्द अशा परांजपे बिल्डर बंधूनां मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. (Mumbai police took action on Famous Paranjape builders)

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय) 59) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंदरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमानव्ये गुन्हा नोंदविलेला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत आज दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटेदस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला. त्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता कोणीही बोलण्यास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT