mumbai news youth killed Dadar due to prior enmity brother injured in attack crime police marathi news Sakal
मुंबई

Mumbai Crime : लेडीज बारवर पोलिसांनी टाकला छापा अन्...!

सकाळ डिजिटल टीम

Pavel Crime : शहरातील क्रेझी बॉईज या लेडीज बारवर पनवेल तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा मारून बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्‍लील हावभाव व अंगविक्षेप करणाऱ्या १२ महिला वेटर, कर्मचारी आणि ग्राहक अशा २४ जणांना ताब्यात घेतले आहे.

पनवेलमधील कोनगाव येथे असलेल्या क्रेझी बाईज या ऑर्केस्ट्रा बारमध्ये महिला सिंगर या अश्लील हावभाव करून ग्राहकांशी स्टेजवरून खाली उतरून शारीरिक लगट करत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सचिन पोवार, राजेश महाला व त्यांच्या पथकाने मंगळवारी रात्री क्रेझी बॉईज या बारमध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर साध्या वेशातील पोलिसांच्या पथकाने या बारमध्ये जाऊन पाहणी केली.

त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास या बारवर छापा मारून तोकडे कपडे घालून ग्राहकांसमोर अश्‍लील हावभाव, अंगविक्षेप करणाऱ्या १२ महिला वेटर, त्यांना प्रोत्साहन देणारे मॅनेजर, वेटर व ग्राहक अशा एकूण २४ जणांविरोधात महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष यामधील अश्‍लील नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व सार्वजनिक मनोरंजनाच्या जागांना लायसन्स देणे व त्यांचे नियंत्रण करणे, अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविकही भारावले, पाहा खास फोटो

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

SCROLL FOR NEXT