Mumbai Police Viral Post  sakal
मुंबई

Mumbai Police Viral Post : गांजा हवाय का? डिलिव्हरी बॉयची ऑफर; तक्रारीनंतर पोलिसांच्या तत्परतेचे होतंय कौतुक

Chinmay Jagtap

Mumbai Police Viral Post : ऑनलाइन फूड डिलिव्हरी हि आजकाल आपल्या आयुष्यातली एक महत्वाचा भाग बनली आहे. मात्र सध्या एक ट्विटर पोस्ट खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. याचे कारण म्हणजे एका फुड डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने ग्राहकाला फूड डिलिव्हरी शिवाय तुम्हाला सिगरेट किंवा गांजा असं काही हवंय का? असा प्रश्न विचारला.

हा प्रश्न विचारतात ग्राहक अचंबित झाला. याबाबत त्याने ट्विट केलं आणि मुंबई पोलिसंनी लगेच त्याला उत्तरही दिल. ही घटना घडली तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. एका ऑनलाइन साईटवरनं ग्राहकाने फूड डिलिव्हरी ऑर्डर केली होती. समोरून फोन आला की तुम्हाला या व्यतिरिक्त गांजा किंवा सिगरेट हवी आहे का? रात्री अडीचच्या सुमारास ट्विट करूनही ज्या प्रकारे मुंबई पोलीसांनी उत्तर दिलं यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रात्री २.३०च्या सुमारास मुंबई पोलिसांनी ट्विट केले होते किं, मॅडम त्यांच्याकडे जे आहे ते आम्हाला हवं आहे. आम्हाला त्या डिलिव्हरी बॉय पर्यंत पोहोचायचं आहे. तो अतिशय चुकीचा वागला आहे. आम्हाला लवकरात लवकर संपर्क साधावा. आम्ही त्याच्यापर्यंत दहा मिनिटात पोहोचतो.

मुंबई पोलिसांनी उत्तर देताच ती पोस्ट डिलीट करण्यात आली. मात्र पोस्ट डिलीट व्हायच्या आधीच प्रचंड व्हायरल झाली. ज्या प्रकारे लगेचच मुंबई पोलिसांनी त्या पोस्टला उत्तर यामुळे पोलिसांच कौतुक होत आहे.

तर दुसरीकडे नागरिकांनी अशा पोस्ट करण्याआधी विचार करायला हवा असंही नागरिक म्हणाले. मुंबई पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे. अशा प्रकारच्या कंमेंट नागरिक पोस्टवर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT