मुंबई

शिवसेना Vs मनसे : पुतण्या आदित्य ठाकरेंनी केलं राज ठाकरेंच्या मनसेचं 'बारसं'

सुमित बागुल

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी हॉकर्स झोन तयार करण्यासाठी सर्व्हे केला होता. मात्र अजूनही ते काम पूर्ण झालेलं नाही. या हॉकर्सकडून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दाखवून खंडणी उकळण्याचं काम चालू असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हंटलंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेने गंभीर आरोप केल्यानंतर शिवसेनेकडून देखील प्रतिक्रिया आली आहे. 

नक्की संदीप देशपणे म्हणालेत काय ? 

"मुंबई महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी हॉकर्स झोन तयार करण्याचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे सर्वे देखील झाले होते. मात्र अजूनही काहीही होत नाही. या हॉकर्सना संरक्षण देऊन त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे उकळण्याचं काम शिवसेना करतेय. सन्मानीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून हे खंडणी उकळण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जातंय", असे गंभीर आरोप मनसेने केले आहेत. 

आदित्य ठाकरेंचा मनसेवर पलटवार 

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री, उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी मनसेवर पलटवार केला आहे. मनसेने शिवसेनेला खंडणीखोर म्हंटले आहे. या आरोपांना उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर टीका केली आहे. म्हणालेत की, "महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे की संघटना आहे हे अजून समजलेलं नाही.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही टाईमपास टोळी असेल. यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते देखील लक्ष देत नाहीत. त्यामुळे मला वाटतं त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही. 

mumbai political news shivsena vs mns reaction of aaditya thackeray after allegations of extortion

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT