मुंबई

उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संवादाने सगळ्यांचं वेधलं लक्ष; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण संपन्न

तुषार सोनवणे

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज संपन्न झालं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे अनेक नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकाच कार्यक्रमात पाहायला मिळाले. त्यांनी आनंदाने एकमेकांशी साधलेला संवाद बघ्यांचे लक्ष वेधून घेत होता. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करीत आहेत. सरकारवर टीका करण्याची कोणतीही संधी मनसे सोडत नाही. शिवाय सध्या महानगरपालिका निवडणूका तोंडावर असल्यान राजकीय टीका टिपण्णीसुद्दा शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा अनावणाच्या कार्यक्रमात दोन्ही भाऊ आनंदाने संवाद सांधत असल्याचे दिसले. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 वाजता कार्यक्रमस्थळी पोहचले. त्याआधीच राज ठाकरे तेथे उपस्थित होते. उद्धव ठाकरे येईपर्यंत राज यांचा मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात यांच्याशी संवाद झाला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर सर्वच नेत्यांनी एकत्र झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आगमन झाल्यानेतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे अनावरण झालं. राज्यातील सर्वच दिग्गज नेते एका व्यासपीठावर आल्याने महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीतील श्रीमंती सर्वांनी अनुभवली.

mumbai political news Uddhav and Raj Thackerays meeting caught everyones attention ShivSena chief Balasaheb Thackerays statue unveiled

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT