BJP Pratik karpe sakal media
मुंबई

"ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट"

ओबीसी आरक्षण गेल्याने मुंबई भाजपची टीका

कृष्ण जोशी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Mva Government) डझनभर ओबीसी मंत्र्यांनी आजपर्यंत ओबीसी समाजाला (obc community) न्याय का मिळवून दिला नाही, असा प्रश्न मुंबई भाजपचे (Mumbai BJP) सचिव प्रतीक करपे (Pratik karpe) यांनी विचारला असून या मंत्र्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी (Ministers resignation demand) त्यांनी केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर मुंबई भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे हे या महाविनाशी ठाकरे सरकारच्या मनातच नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीकाही करपे यांनी केली आहे.

मविआ सरकारमधील मंत्र्यांनीही आतापर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिला नाही. पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला केंद्र डेटा देत नाही, असे वारंवार बोलून महाविनाश आघाडी सरकार पळ काढत आहे. मविआ सरकारमधील ओबीसी मंत्री हे फक्त वसुलीसाठी बसले आहेत का ? असा प्रश्नही निर्माण होत असल्याचे करपे म्हणाले.

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इंपेरिकल डेटा गोळा करण्यासाठी राज्यसरकारने 453 कोटींची मंजुरी दिली. पण, प्रत्यक्षात फक्त पाच कोटींचा निधी देण्यात आला, असेही त्यांनी दाखवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरुंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. राज्य सरकारच्या ओबीसी मंत्र्यांना जाग आली नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही करपे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT