Ashish Shelar-Kishori Pednekar google
मुंबई

आक्षेपार्ह टिप्पणी भोवली; आशिष शेलारांवर गुन्हा दाखल!

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या महापौरांविरोधात (Mumbai Mayor) आक्षेपार्ह शब्द (Offensive statement) वापरल्यानं भाजपचे नेते आशिष शेलार (BJP Ashish Shelar) यांच्यावर गुन्हा दाखल (Police FIR) करण्यात आला आहे. मुंबईच्या नरिमन पॉईंट पोलीस स्टेशनमध्ये (Narimon Point police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना महापौरांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला होता, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी असं निवेदन काल शिवसेनेच्या नगरसेविकांनी मुंबई पोलीस आ़युक्तांना दिलं होतं तसंच महापौर किशोरी पेडणेकर यंनी गृहमंत्र्यांकडे तक्रारही केली होती. त्यावरुन भा द वीच्या कलम 354 अ (4) आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात वरळीला एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता, त्यानंतर जवळपास तीन दिवसांनी महापौर रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावरुन आशिष शेलार यांनी महापौरांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

Ganeshotsav 2025: ढोल-ताशा सरावासाठी तयार आहात? 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Akola Elections: अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम; इच्छुकांमध्ये विविध प्रतिक्रिया

राज्य उत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’ नको

'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; हास्यजत्रेमधील 'हा' अभिनेता दिसतोय मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT