Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: २२ हजार किलोमीटर रस्ते धुतले, प्रदूषण पातळी घटली

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pollution: मुंबईतील २२ हजार किलोमीटर रस्ते आतापार्यंत धुतले आहेत. त्यामुळे प्रदूषण पातळी घटली असून वातावरणाचा स्तर सुधारण्यास मदत झाली, असा दावा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केला. महास्वच्छता अभियानाच्या उद्‍घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चहल म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत आतापर्यंत संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे २२ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते धुण्यात आले आहेत. आजवर १३ विभागांत संपूर्ण स्वच्छता करण्यात आली आहे. त्यातून १८३ टन कचरा आणि १,१०० टन राडारोडा उचलण्यात आला आहे.

दररोज एक हजार किलोमीटर रस्ते धुण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून हवा गुणवत्ता निर्देशांक ३५० वरून निम्म्यावर आला आहे. काही ठिकाणी तर तो ९० च्याही खाली आला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभियानाला नवचेतना मिळाली असून त्याचे जनचळवळीत परावर्तन झाले आहे. मुंबई मॉडेल देशासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही चहल यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

“ही फियाट गाडी माझी म्हणू का” ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचा धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर Viral Video

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

ANAYA BANGAR: "माझं क्रिकेट संपलं वाटलेलं, पण अनाया बांगर हिचं मैदानात दमदार पुनरागमन! 'या' देशाने दिला ग्रीन सिग्नल, महिला लीग गाजवणार?

SCROLL FOR NEXT