deepak kesarkar  Esakal
मुंबई

Mumbai Pollution News :मुंबई प्रदूषणमुक्त होणारच; पालकमंत्री दीपक केसरकारांनी सांगीतला प्लॅन

Pollution Free Mumbai : डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना कराव्या लागतील

सकाळ डिजिटल टीम

Deepak Kesarkar : मुंबईतील हवेचा दर्जा खालावत आहे. शहर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे असून त्या दृष्टीने उपाययोजना तातडीने हाती घेतल्या आहेत. प्रदूषण नियंत्रणात मोठ्या कंपन्या तसेच उद्योगांनीही सहभाग घेण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

वाहनांचे प्रदूषण, इमारतींच्या बांधकामांमुळे होणारे प्रदूषण यावर कसे नियंत्रण मिळवता येईल, हे पाहावे लागेल. रासायनिक कंपन्यांमधील प्रदूषण, जैविक कचरा जाळणे, स्मशानभूमीतील धुरामुळे तसेच डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणावर उपाययोजना कराव्या लागतील. समुद्राच्या चौपाट्यांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने वेगळेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्री केसरकर यांनी दिली.

मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या बांधकामांवेळी नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते. त्याचबरोबर मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायुप्रदूषण होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत.

काही कंपन्या आणि उद्योग प्रदूषण रोखण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रदूषण रोखण्याबाबत पालिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात यश येईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

मिठी नदीची स्वच्छता

मिठी नदी समुद्राला मिळते, तो माहीमच्या समुद्राच्या भागाकडे लक्ष द्यावे लागेल. या भागात मिठी नदीतून वाहून येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची साफसफाई करावी लागेल. मी सोमवारी माहीम ते दादर चौपाटी असा फेरफटका मारणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT