Murder  sakal
मुंबई

Mumbai Air Hostess Murder: मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेसची गळा चिरुन निर्घृण हत्या!

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच ती रहायला होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबईजवळील पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मरोळ इथल्या राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. (Mumbai Powai Air Hostess Murder Rupal Ogare was brutally murdered by slitting her throat)

सुत्रांच्या माहितीनुसार, रूपल ओगरे (वय २३, मूळगाव रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच असलेल्या अंधेरी उपनगरातील मरोळ इथंल्या एनजी कॉम्प्लेक्स इथं ती आपली बहिण आणि मित्रासोबत रहायला होती.

दरम्यान, हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती कारण तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते. पवई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT