मुंबई

Mumbai Lights Updates: मुंबईत लाईट नाही; पाणी पुरवठाही खंडित

पूजा विचारे

मुंबईः  विविध ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे संपूर्ण महामुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे लोकलसेवाही ठप्प झाली असून रुग्णालयातही दैनंदिन सेवा बंद पडल्या आहेत.

जाणून घ्या मुंबईतील वीज पुरवठा खंडीत संदर्भातले अपडेट्स

  • अनेक भागातील पाणी पुरवठाही खंडीत झाला आहे.
  • कलवा पडघा आणि खारघर येथील ट्रान्सफरमर मध्ये ट्रीपिंग झाल्याने सकाळी 10:30 वाजल्याच्या सुमारास संपूर्ण महामुंबईचाा विज पुरवठा बंद झाला आहे.
  • लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे वीज पुरवठा कंपन्यांकडून सांगण्यात आले.
  • यामुळे सर्वच रुग्णालयाती एक्सरे,एमआरआय मशिन बंद पडल्याने रुग्णांचे हाल होत आहे.तसेच लोकल सेवाहीी बंद पडली आहे.काही शस्त्रक्रीयांवरही परीणाम होण्याची शक्यता आहे.
  • ग्रीड बंद पडल्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवा  थांबल्या आहेत..मात्र रोहा- जेएनपीटी विभागातील रेल्वे सेवा सुरू आहे.
  • सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते बोरिवली दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे आहे. दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होईल, असे पश्चिम रेल्वेने सांगितले.  दरम्यान, बोरिवली ते विरार मार्गावरील लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचेही पश्चिम रेल्वेने सांगितले.
  • रुग्णालयाना तातडीने जनरेटर आणि इंधन पुरविण्याचे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहे .किमान आठ तास पुरेल इतका इंधन साठी करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.विशेषता आयसीयू सेवेत खंड पडू न देण्याचे आदेश देण्यात आले आहे.
  • मध्य रेल्वे मार्गावर 10.5 मिनिटाने बंद पडलेली हार्बर रेल्वे मार्ग आता 10.55 वाजताच्या दरम्यान हार्बर रेल्वे मार्ग पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. तर मेन लाईन अद्याप ठप्प आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

प्रीपेड वीजबिल वसुलीची ‘सरकारी एन्ट्री’! वीजजोडण्या बदलण्यास ऊर्जा विभागाची मंजुरी

Kedarnath Yatra: केदारनाथ यात्रेकरूंना मोठे गिफ्ट! १३ वर्षांनंतर रामबाडा-गरुडचट्टी मार्ग 'रेडी'; आपत्तीच्या काळात ठरणार 'लाईफलाईन'!

SCROLL FOR NEXT