तेजस एक्स्प्रेस  sakal
मुंबई

खासगी तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या पसंतीची : पश्चिम रेल्वे

ही गाडी कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर प्रवाशांसाठी 7 ऑगस्टपासून सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) द्वारे मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद खासगी तेसज एक्स्प्रेस चालविण्यात येत आहे. ही गाडी कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर प्रवाशांसाठी 7 ऑगस्टपासून सुरू झाली. तर, मागील दोन महिन्यात या एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून प्रवाशांमध्ये पसंतीची ट्रेन असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

गाडी क्रमांक 82901/02 अहमदाबाद-मुंबई सेंट्रल-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आयआरसीटीसीकडून चालविण्यात येत आहे. लाॅकडाऊनमुळे भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद होती. मात्र, काही महिन्यांनी प्रवासी रेल्वे सेवा हळूहळू पूर्वरत केली. परंतु, यावेळी तेजस एक्सप्रेस बंद ठेवली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2020 रोजी तेजस एक्स्प्रेस सुरू केली. प्रवासी संख्या कमी असल्याने काही दिवसांनी एक्स्प्रेस बंद केली.

पुन्हा 14 फेब्रुवारी 2021 रोजी तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. मात्र, एप्रिल 2021 मध्ये गुजरात आणि महाराष्ट्रात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने 6 ऑगस्टपर्यंत एक्स्प्रेस बंद ठेवली. तर, 7 ऑगस्ट रोजी एक्स्प्रेस कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करून सुरू करण्यात आली. तेजस एक्स्प्रेस सध्या आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी, असे चार दिवस धावत आहे.

तेजस एक्स्प्रेसमधून प्रवाशांनी प्रवास करण्यासाठी वेगवेगळ्या योजना, सुविधा अंमलात आणल्या जात आहेत. यामध्ये रक्षाबंधन सणाच्या निमित्त्याने तेजस एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी कॅशबॅक सुविधा सुरू केली होती. या सुविधेचा लाभ 2 हजार 200 महिला प्रवाशांनी घेतला आहे. यासह त्यांना भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर तेजस एक्स्प्रेसमध्ये लकी ड्रॉमध्ये 200 हून अधिक प्रवाशांनी विशेष भेटवस्तू जिंकल्या.

सध्याच्या कठिण काळात प्रवाशांनी त्याचा प्रवास आरामशीर आणि सुरक्षित वातावरणात करण्यासाठी प्रवाशांना प्रवासात जागतिक दर्जाच्या सेवांचा अनुभव दिला जात आहे. मुंबई-अहमदाबाद प्रवास करण्यासाठी प्रवासी तेजस एक्स्प्रेसची निवड करत आहेत. त्यामुळे तेजस एक्स्प्रेसचा प्रवास प्रवाशांसाठी एक कायमची आठवण राहत आहे, असे आयआरसीटीचे समूह महाव्यवस्थापक राहुल हिमालियन यांनी सांगितले.

कोरोना काळात सेफ्टी प्रोटोकाॅलचे काटेकोरपद्धतीने अंमलबजावणी केली जात असल्याने आरआरटीसीचा विश्वास अनेक पटीने वाढला आहे. त्यामुळे प्रवाशांकडून याबाबत प्रशंसा केली जाते. उच्च दर्जाची सेवा दिल्यामुळे, कोरोना काळात उत्तम स्वच्छता राखल्याने अनेक प्रवासी आता इतर गाड्यांपेक्षा तेजस एक्स्प्रेसची निवड करत आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT