accident sakal
मुंबई

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात थांबता थांबेना; सहा महिन्यात ४० मृत्यू

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून, वेगवान वाहने आणि लेन कटिंगमुळे अपघाताची सर्वाधिक संख्या दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून, वेगवान वाहने आणि लेन कटिंगमुळे अपघाताची सर्वाधिक संख्या दिसून येत आहे.

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात कमी होण्याचे नाव घेत नसून, वेगवान वाहने आणि लेन कटिंगमुळे अपघाताची सर्वाधिक संख्या दिसून येत आहे. कोरोना काळात रस्त्यांवरील वाहतूक घटली होती. त्यामुळे अपघात सुद्धा घटल्याचे निदर्शनात आले मात्र, २०२० नंतर अपघात आणि अपघातांमध्ये मृत्यूच्या संख्येत वाढच होत घेल्याचे चित्र आहे. तर यावर्षी फक्त सहा महिन्यात जीवघेण्या अपघातांमध्ये सुमारे ४० पेक्षा जास्त मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली असून, हा जीवघेणा प्रवास कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबई - पुणे आणि पुणे - मुंबई दोन्ही द्रुतगती महामार्गावर अनेक ठिकाणी अपघाताचे ब्लॅक स्पॉट असून, वर्षानुवर्षांपासून अपघाती ब्लॅक स्पॉटची पाहिजे त्याप्रमाणात दुरुस्ती होत नसल्याचे दिसून येत आहे. शिवाय यामध्ये सर्वाधिक अपघात वाहतुकीचे नियम मोडल्यानेच होत असल्याचे महामार्ग पोलीसांचा निष्कर्ष आहे. यामध्ये अती वेगाने वाहन चालवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवणे, विना सीट बेल्ट वाहन चालवणे, लेन कटिंग करणे, पहाटेच्या वेळी झोपेच्या धुंदीत वाहन चालवणे असे अनेक कारणांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे.

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गंभीर अपघाताने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांचा प्रश्न येरनिवर आला आहे. गेल्या पाच वर्षात ४४२ मृत्यू झाले असून, १२७७ अपघात झाले आहे. यामध्ये गेल्यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यात ४१ जीवघेण्या अपघातामध्ये ५० मृत्यू झाले तर यावर्षी याच सहा महिन्याच्या कालावधीत ३० अपघातामध्ये ४० मृत्यू झाले आहे. मात्र, गेल्या २०२० च्या तुलनेत सहा महिन्याचे अपघात आणि मृत्यूची संख्या बघता, अपघात आणि मृत्यू मध्ये वाढ झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT