mumbai pune express way  sakal media
मुंबई

Mumbai Pune Express Way: द्रुतगती मार्गावर आज दोन तास मेगा ब्लॉक!

सकाळ डिजिटल टीम

mumbai: गॅंट्री बसवण्याच्या कामासाठी मंगळवारी (ता. ५) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा हद्दीत मुंबई लेन दोन तासांसाठी बंद राहणार आहे. मंगळवारी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान मुंबई लेनवर खंडाळा हद्दीत गॅंट्री बसवली जाणार आहे.

या कालावधीत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. जड-अवजड वाहने उर्से टोल नाका या ठिकाणी तसेच शोल्डर लेनवर थांबवण्यात येणार आहेत. केवळ कारसाठी लोणावळा बाह्य मार्ग येथून जुना पुणे-मुंबई महामार्ग, अंडा पॉइंटमार्गे मुंबई बाजूकडे वाहतूक सुरू राहील.

गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर ग्रँटी बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या ब्लॉकमुळे दुपारच्या वेळी महामार्गावर वाहनांची गर्दी होणार आहे. त्यामुळे या वेळेत प्रवासी नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णवाहिकेलाही डिझेल नाही! मृतदेह घेऊन जाणारी गाडी मध्यरात्री पंपावर ठप्प, शासनाच्या नियमालाही हरताळ

पुण्यात टोळीयुद्ध थांबेना! वनराजच्या हत्येनंतर २० महिन्यात आंदेकर टोळीनं तिघांना संपवलं, अजून किती बळी जाणार?

Mumbai Goa Highway: काम अर्धवट पण वसुलीत मात्र हायटेक! निकृष्ट व अपूर्ण काम, तरीही मुंबई-गाेवा महामार्गावरील खारपाडा टोल नाका सुरू, रायगडकरांचा उद्रेक

Latest Marathi News Live Update : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलन

NEET Paper Leak Exposed: NEET पेपरफुटीचा भांडाफोड करणारे, व्हायरल PDF दाखवणारे शशिकांत सुथार कोण?

SCROLL FOR NEXT