Mumbai-Pune Expressway block Esakal
मुंबई

Mumbai Pune Traffic Update : 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे'वरील वाहतुकीत आज महत्वाचे बदल! जाणून घ्या पर्यायी मार्ग

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर (पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या मंगळवारी (ता. २३) हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबईच्या मार्गावर २४.२५० व पुणे मार्गावर ५६.९०० किलोमीटर (कुसगाव वाडी) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते दोन दरम्यान वाहतूक वळविली आहे.

पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किलोमीटर ५५ वरून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे-मुंबई महामार्गावरून मार्गस्थ करण्यात येणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने व बस खोपोली एक्झिट किलोमीटर ३९.८०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना पुणे मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या मार्गावर जातील.

पुण्याहून मुंबईकडे जाणारी हलकी व जड-अवजड वाहने ही खालापूर टोल नाका, शेवटच्या लेनने खालापूर एक्झिट किलोमीटर ३२.५०० येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोलनाकामार्गे मुंबईच्या रस्त्यावर मार्गस्थ होतील. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ या मार्गावरून पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून सरळ पनवेल दिशेने मार्गस्थ होतील. मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने किलोमीटर ५४.९०० येथील कुसगाव टोल नाका येथून वळवून जुना पुणे-मुंबई महामार्गावरून पुणे बाजूकडे वळविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT