Pune-Mumbai Expressway  sakal
मुंबई

Mumbai-Pune Travel : मुंबई-पुणे प्रवासाचं प्लॅनिंग असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! वाहतूक मार्गात होणार 'हे' बदल

सकाळ डिजिटल टीम

Mumbai-Pune Travel Update : मुंबई-पुणे प्रवासाचे प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवर वाहतूकीत काही काळासाठी बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवासाचे नियोजन असणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरील (पुणेकडे जाणा-या) कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक आज (दिनांक १२ फेब्रुवारी) रोजी दुपारी १२.०० ते दुपारी ०३.०० या कालावधीत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

तसेच ही वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश इन हॉटेल जवळून पनवेल रंम्प पासून पून्हा द्रुतगती मार्गे पुणेकडे वळविण्यात येणार आहे.

आज दुपारी १२ ते ३ या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा असे अवाहन करण्यात आले आहे.

तसेच या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या दुरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT