Mumbai Pune Express Way sakal
मुंबई

Express Way Block: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे राहणार दोन तास बंद!

वाहतुकीचे नियोजन करा; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सुरक्षा उपायांसाठी दोन तासांची वाहतूक बंदी

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Pune Express Way: मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेच्या मुंबई वाहिनीवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत वाहनांवर वॉच ठेवण्याकरिता सर्व्हिलन्स कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेली गॅन्ट्री बसवण्यासाठी उद्या मंगळवारी दुपारी १२ ते २ या वेळेत मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या बदलाची दखल घेत वाहनधारकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे.

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरून दररोज लाखो वाहने ये- जा करतात. अनेक वाहन चालक वेग मर्यादेचे उल्लंघन करत असल्याने जीवघेणे अपघात घडतात. त्याला चाप लावण्यासाठी एमएसआरडीसी ठिकठिकाणी गॅन्ट्री उभारून त्यावर सर्व्हिलन्स कॅमेरे बसवणार आहे. त्याचाच भाग म्हणून एक्स्प्रेस वेच्या मुंबई वाहिनीवर १५.७५० किमी येथे गॅन्ट्री बसवण्यासाठी मंगळवारी दोन तसाच ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून- मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे. दरम्यान वाहनधारकांना ब्लॉक कालावधीत पर्यायी मार्गाने प्रवास करता येणार आहे.

- द्रुतगती मार्गावरुन पुणे ते मुंबई वाहिनीवरील (पुण्याहुन मुंबईकडे येणारी) हलकी वाहने मुंबई वाहिनीवर लेन किमी ५५ वरुन वळवुन मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुना पुणे- मुंबई मार्गावरुन मार्गस्थ होतील.

- पुणे ते मुंबई वाहिनीवरील मुंबईकडे येणारी हलकी वाहने व बसेस खोपोली एक्झिट किमी ३९ येथुन वळवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरुन खोपोली शहरातून पुढे शेंडूग टोल नाका मार्गे मुंबई वाहिनीवरुन मार्गस्थ होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT