Mumbai Pune Highway Accident Sakal
मुंबई

Mumbai Pune Highway Accident : अवघ्या ८ व्या वर्षी गमावला जीव; चिमुरड्याच्या शेवटच्या वादनाचा व्हिडीओ

हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैष्णवी कारंजकर

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बसमधल्या १३ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण बाजीप्रभू ढोल ताशा पथकाचे सदस्य होते. त्यांचा शेवटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मुंबईतल्या गोरेगाव इथलं बाजीप्रभू ढोल ताशा पथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातल्या पिंपळे गुरव, सुदर्शन नगर इथं ढोल ताशा वादन करण्यासाठी आले होते. ढोल ताशा वादन करून रात्री उशिरा हे पथक मुंबईकडे निघालं होतं. पण बस चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला आणि १३ जणांचा मृत्यू झाला.

जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ढोल-ताशा पथकाचे सदस्य होते. मृतांमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा वीर कमलेश मांडवकर याचा देखील समावेश होता. कालच्या मिरवणुकीत वादन करतानाचा या आठ वर्षीय चिमुरड्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या वर्षीच हे पथक तयार करण्यात आलं होतं, अशीही माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे, तसंच आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT