CM Eknath Shinde 
मुंबई

Mumbai-Pune Highway Accident : अपघातस्थळाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; ब्लॅकस्पॉट...

रवींद्र देशमुख

खोपोली : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बोर घाट येथे एक खासगी बस दरीत कोसळून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 12 ते 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 24 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बसमध्ये एकूण 40 ते 45 लोक प्रवास करत होते. या अपघाताची दखल सरकारने घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळाची पाहाणी केली आहे.

यावेळी शिंदे म्हणाले की, खोपोलीत घडलेली घटना दुर्दैवी आहे. झांजपथकातील मुलं बसमध्ये होती. जखमी मुलाशी मी बोललो. वाहन वेगाने होतं. त्यांनी चालकाला वाहन सावकाश चालवण्याची सूचना केली होती, मात्र त्याने ऐकली नाही, असं जखमी मुलाने सांगितलं.

What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

दरम्यान या घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील दखल घेतली आहे. भविष्यात अशाप्रकराच्या घटना होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय कसे करता येईल, त्यासाठी नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी, एमएसआरडीसींना सूचना केल्या आहे. अनेकअपघात प्रामुख्याने पहाटेच्या सुमारास झाले आहे. ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट आहेत, ते आयडेंटीफाय करण्याची सूचना केल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

दरम्यान रेस्क्यू टीम तातडीने पोहोचली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टळल्याचही शिंदे म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून मदतही जाहीर करण्यात आलेली आहे. अधिक माहितीनुसार, ही बस पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT