Corona Update sakal media
मुंबई

मुंबईत 'या' परिसरात सर्वाधिक सक्रिय रुग्ण, 5 वाॅर्डमध्ये रुग्णसंख्या अधिक

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत रूग्ण (Mumbai Corona patient) संख्या घटत आहे हे आशादायी वृत्त असले तरी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आर सेंटर वॉर्ड म्हणजेच बोरिवलीत (Borivali) अद्याप ही सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरु असल्या तरी सक्रिय रुग्णांचे (Active Patients) आव्हान कायम असल्याचे मुंबईत चित्र आहे. ( Mumbai R Ward Borivali corona Active patients too much still-nss91)

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार मुंबईत 5,779 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. अशातच 5 वॉर्डातील सक्रिय म्हणजेच उपचाराधीन रूग्ण संख्या अद्याप ही चिंतेची बाब असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 24 वॉर्ड असून बहुतांश वॉर्डात रूग्ण संख्या घटल्याचे चित्र आहे. एकंदरीत मुंबईचा विचार केल्यास के पूर्व वॉर्ड अंधेरी आणि बोरिवली सह कांदिवली या भागात सक्रिय रूग्ण संख्या चिंता वाढवत आहे. यात बोरिवली आर सेंट्रल (आर सी) वॉर्डात 534 इतके सक्रिय रूग्ण संख्या आहेत. त्यापाठोपाठ के पश्चिम वाॅर्डमध्ये 463 एवढ्या सक्रिय रूग्णांची संख्या आहे. तसेच, आर दक्षिण वॉर्डात 432 एवढी सक्रिय रूग्ण संख्या आहे. तर के पूर्व वॉर्डात 351 एवढे सक्रिय रूग्ण आहेत. तर, एस वाॅर्डमध्ये 375 सक्रिय रुग्णांची संख्या आहे.

हे पाच वॉर्ड सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक नोंदवत आहेत. उर्वरित 19 वॉर्डात 300 हून कमी सक्रिय रुग्ण संख्या आहे. सर्वात कमी सी वॉर्डात सक्रिय रूग्ण संख्या असून ती 3 एवढी नोंदवण्यात आली आहे. शहरातील सक्रिय प्रकरणे 6,000 पेक्षा कमी आहेत. त्यापैकी दोन हजार रुग्ण हे केवळ पाच वाॅर्डमधील  आहेत. शहरातील 24 प्रभागांपैकी आरसी वॉर्ड (बोरिवली) मध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. के पश्चिम वॉर्ड (अंधेरी) आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येसह 53,112 पहिल्या क्रमांकावर आहे. पण, आता सक्रिय रुग्णांच्या तुलनेत हा वॉर्ड

बोरिवली आणि कांदिवलीच्याही मागे आहे. पालिका अधिकाऱ्याने सांगितले की, “ पश्चिम उपनगरांमधील प्रभागांची लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणूनच दक्षिणी प्रभागांच्या तुलनेत सक्रिय प्रकरणांची संख्या जास्त आहे.

24 जुलै सक्रिय रुग्ण

टाॅप 5 वाॅर्ड-

आर सेंट्रल -

मध्यवर्ती (बोरिवली): 534 के पश्चिम (अंधेरी प, विलेपार्ले प, सांताक्रूझ प): 463

आर दक्षिण (कांदिवली) 432

के पूर्व (अंधेरी पू, विलेपार्ले पू, सांताक्रूझ पू): 351

एस (भांडुप): 375

पालिकेच्या वॉर्डात एस प्रभागात नवीन रूग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. एस वॉर्डात 0.08 टक्के नवीन रूग्ण आढळण्याचे प्रमाण आहे. या पाठोपाठ आर सेंट्रल बोरिवली वॉर्डात हे प्रमाण 0.07 टक्के एवढे आहे. उर्वरित 24 वॉर्डात ही टक्केवारी कमी होत असल्याचे डॅश बोर्ड सांगतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

Viral Video Mother Dolphin : मन हेलावणारी घटना! मृत डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Lucky Rashifal 2026: कन्या राशीसह 'या'3 राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल नवे वर्ष, सर्व इच्छा पूर्ण होतील

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

SCROLL FOR NEXT