Dombivli Crime News Sakal
मुंबई

Dombivli Crime News: रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाची हवालदाराने केली हत्या

रेल्वे आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग यांची हवालदार पंकज यादव (वय 30) याने लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे.

शर्मिला वाळुंज

Dombivli Crime News - रेल्वे आरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज गर्ग यांची हवालदार पंकज यादव (वय 30) याने लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. बॅरेक मध्ये इतर पोलीस कर्मचारी उपस्थित असताना ही हत्या झाल्याने कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली.

हत्या करून यादव याने तेथून पळ काढला. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी 4 तासात हवालदार यादव याला पेण येथून अटक केली आहे. गर्ग यांच्या हत्येनंतर तिघांच्या हत्येचा पंकज याचा डाव होता. तो डाव पोलिसांनी उधळून लावला आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकात पोलीस उपनिरीक्षक म्हणून बसवराज गर्ग (वय ) हे कार्यरत होते. गर्ग यांच्या हत्येप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कल्याण सहाय्यक सुरक्षा कार्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राकेशकुमार त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल तक्रारीनुसार कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर येथे रेल्वे आरपीएफचे बॅरेक असून याठिकाणी गर्ग हे इतर सहकारी राकेश कुमार त्रिपाठी, राजकुमार भोसले, आर. एस. यादव, एस. बी. हजरे, विजय गोरे, पी. सी. शर्मा यांचेसह रहात होते.

बुधवारी रात्री पावणे 10 च्या सुमारास त्रिपाठी हे धुतलेले कपडे काढण्यासाठी बॅरेक मधून बाहेर आले होते. यावेळी गर्ग हे बॅरेक मध्ये आराम करत बिछान्यावर पडले होते. यादरम्यान एक व्यक्ती बॅरेक मध्ये शिरल्याचे त्रिपाठी यांनी पाहिले.

दरम्यान बॅरेक मधून ओरडण्याचा आवाज आल्याने त्रिपाठी यांनी आत जाऊन पाहिले तर बसवराज हे जमिनीवर पडलेले दिसले. आजूबाजूला सर्व सामान अस्ताव्यस्त पडली होते. त्यांनी काय झाले असे विचारले असता त्या व्यक्तीने "आप बिच मे मत पडो" असे सांगितले.

त्रिपाठी यांनी बाहेर येत आजूबाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांना आवाज देत बोलावले. यावेळी एस. एस. घंटे, संतोश पटेल, गंगेश, उमाशंकर कमी, अमित व इतर काही सहकारी त्याठिकाणी पळत आले. इतर कर्मचारी आल्याने यादव याने घटनास्थळावरून पळ काढला. इतर सहकाऱ्यांनी तो हवालदार पंकज यादव असल्याचे त्रिपाठी यांना सांगितले.

सर्व सहकाऱ्यांनी बॅरेक मध्ये पुन्हा धाव घेतली. बसवराज यांच्या बाजूला लाकडी दांडका पडलेला होता. या दांडक्याने त्यांना मारहाण झाली होती. सहकाऱ्यांनी गर्ग यांना उपचारासाठी कल्याण येथील मध्य रेल्वे रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी गर्ग यांना मयत घोषित केले.

त्रिपाठी यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत गर्ग यांच्या हत्येप्रकरणी फिर्याद दाखल केली. दाखल तक्रारीवरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपी यादव याचा शोध सूरु केला. तो चिपळूण येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार एक पथक तात्काळ चिपळूण येथे रवाना झाले. तोच यादव हा पेण येथे बॅरेक मध्ये असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचत पोलिसांनी पेण येथून यादव ला अटक केल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. पहाटे 4 वाजता यादव याला अटक करण्यात आली आहे.

आणखी तिघांची करायची होती हत्या...

पोलीस उप निरीक्षक गर्ग व हवालदार यादव हे 2019 मध्ये कल्याण येथे कार्यरत होते. यावेळी आरोपी यादव आणि त्याचे काही सहकारी या दोघांत भांडण झाले असताना त्याची चौकशी गर्ग यांनी केली होती आणि त्यात त्याला 4 वर्षाची पदोन्नती व पगारवाढ ही कमी करण्यात आली होती. याचा राग यादव याला होता.

या चौकशीत गर्ग यांच्या व्यतिरिक्त इन्स्पेक्टर बर्वे, माने आणि हवालदार घरत यांनीही याची चार्जशीट बनविण्यासाठी मदत केली होती. त्या तिघांचा ही राग यादव याला होता. गर्ग यांची हत्या केल्यानंतर बर्वे, माने व घरत या तिघांनाही संपविण्याचा डाव यादव याने रचला होता. पोलिसांनी हा सर्व डाव उधळून लावत चार तासात यादव याला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT